Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

केंद्राकडून पंतप्रधान पीक विमा योजनेला मुदतवाढ

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
नवीदिल्ली- अनेक शेतकऱ्यांकडून आणि राज्य सरकारकडून पंतप्रधान पीक विमान योजनेसाठी मुदतवाढ अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून होणारी मागणी पाहता पीक विमा योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीची मुदत ही १५ जुलै देण्यात आली होती. पण अनेक शेतकऱ्यांकडून योजनेशी संबंधित औपचारिक अपुर्ण राहिल्यानेच ही मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला. आता २३ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत सगभागी होता येणार आहे.
महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनीही योजनेला मुदतवाढ मिळावे असे पत्र केंद्राला लिहिले होते. अखेर शेतकऱ्यांची मागणी पाहूनच ही मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. योजनेला मुदतवाढ मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांच्या विम्यासाठी शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकारने योजनेला मुदतवाढ मिळावी अशा आशयाचा ईमेल हा आज गुरूवारी पाठवला होता. या ईमेलमध्ये सहा विमा कंपन्यांचाही उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये एआयएलसी, बजाज अलायन्स, भारती एक्सा जीआयसी, एचडीएफसी एर्गो, इफ्को जीआयसी, रिलायन्स जीआयसी यासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना कोरोनाच्या स्थितीमुळे या पीक विम्याशी संबंधित प्रक्रियेची पूर्तता करण्यात अडचणी येत असल्याची सबब महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली होती. तसेच योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळावी अशीही विनंती करण्यात आली होती. अखेर महाराष्ट्राच्या विनंतीला मान देत केंद्रानेही योजनेला मुदतवाढ देण्याचे जाहीर केले.

 

Post a Comment

0 Comments