Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोबाईल चोर अटक ; एलसीबीची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीरामपूर - रात्रीचे वेळी घराचे उघड्या खिडकीमधून हात घालून मोबाईल चोरणारा आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्याची कारवाई   स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार  सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ मनोज गोसावी, पोना दिपक शिंदे, विशाल दळवी, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, पोकॉ सागर ससाणे, रोहित येमूल, संदीप चव्हाण, चापोहेकॉ चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. २३/०४/२०२१ रोजी रात्रीच्या वेळी मोबाईल घरामध्ये खिडकीजवळ चार्जिंगला लावून झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने  १० हजार रु. किं. चा विवो कंपनीचा मोबाईल चोरुन नेला होता. सदर मोबाईल चोरीबाबत पूजा प्रकाश आहीरे (रा. झिरंगेवस्ती, वार्ड नं. १, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात  गुरनं. २२७/ २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांना सदरचा गुन्हा भारत सोनटक्के ( रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर) याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी पथकाला श्री कटके यांनी सूचना दिल्या असता पथकाने आरोपीचा शोध घेऊन आरोपी भारत सुधाकर सोनटक्के ( रा. वार्ड नं. २, श्रीरामपूर) ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेला १० हजार रु. किं. चा विवो कंपनीचा एस-१ मॉडेलचा मोबाईल काढून दिल्याने सदरचा मोबाईल जप्त करुन आरोपीस मुद्देमालासह श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात  हजर करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments