Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांचा पोलिस अधीक्षक पाटील यांच्या हस्ते पदक देऊन गौरव

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालक यांचे अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस दलातील निवड झालेल्या पोलिस अंमलदार यांचा शुक्रवार (दि.16)  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला. गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पोलिस मुख्यालयातील सफौ प्रल्हाद अर्जुन चिंचकर, एलसीबीचे पोना देवेंद्र दिलीप शेलार, पोना शरद मारुती बुधवंत, गुणवत्तापूर्ण सेवा व खेळाडू पोहेकाॅ विश्र्वास अर्जुन बेरड, राष्ट्रीयस्तरावर कंमाडो प्रशिक्षणामध्ये सुवर्णपदक मिळविलेले सायबर पोलिस ठाण्याचे पोकाॅ गणेश कलगोंडा पाटील आदिंचा गौरव करण्यात आला आहे.
 यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक दीपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके आदिंसह जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.Post a Comment

0 Comments