Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अट्टल गुन्हेगार जेरबंद, दोघांसह एका महिला अटक ; कर्जत पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- ग्रामस्थांच्या मदतीने जबरी चोरी करणा-या दोन अट्टल गुन्हेगारांसह एका महिला अटक करण्याची कारवाई कर्जत पोलिसांनी केली आहे.  रामेश्वर जंगल्या भोसले (वय 25) व धला उर्फ मोहिनी रामेश्वर भोसले ( 22, रा. आष्टी, जि.बीड) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पो.नि. चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या सूचनेनुसार सपोनि सुरेश माने, पोसई अमरजित मोरे, किरण साळुंके पोहेकाॅ प्रबोध हंचे, बबन दहिफळे, पोना शाम जाधव, रवी वाघ सुनील खैरे, महादेव कोहक, संतोष फुंदे, गोवर्धन कदम, गणेश काळाने, बळीराम काकडे, मपोका राणी व्यवहारे, रिंकी माढेकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,
दि. 26 जुलैला दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांना फोन आला.  रामचंद्र गायकवाड ( रा. शितपूर, ता. कर्जत) यांच्या घरी चोरी झालेली आहे. यानंतर तात्काळ अधिकारी व  पोलिस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. यावेळी पोलिसांनी मिळालेली माहिती,  दुपारच्या वेळी तक्रारदार रामचंद्र बाबासाहेब गायकवाड ( वय 67 ) हे आपल्या घरात झोपले होते. या दरम्यान  अचानक कपाटाचा आवाज आल्याने जाग आली. त्यांना घरात चोरटे दिसले. गायकवाड यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता,  त्यांना चोरट्यांनी लोखंडी टॉमीने जबर मारहाण केली. जबरदस्तीने त्यांच्याकडून त्यांच्या खिशातील व घरातील सोन्याचे दागिने व पैसे असा  2 लाख 20 हजार  रु चा माल जबदस्तीने काढून घेतला. 
सदरचे आरोपी हे नागलवाडीच्या दिशेने पळालेले आहेत, अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ कर्जत पोलिस व गावकऱ्यांनी समोरच्या लोकांना फोन केले.  दरम्यान पाठलाग करत असताना तीन आरोपींपैकी एक आरोपी  ढेबऱ्या उर्फ रामेश्वर राम चव्हाण (वय 25  रा.ब्रह्मगाव, ता. आष्टी, जि. बीड) हा सापडला. त्यास विचारपूस केली असता योग्य ती माहिती दिली नाही. त्यानंतर कर्जत पोलिसांनी तात्काळ नागलवाडी मधून ज्या दिशेने रोड जातात त्या दिशेला पोलिस रवाना होऊन पाठलाग सुरू झाला. माहिती घेत घेत शेवटी पोलिसांनी आष्टी येथे रामेश्वर जंगल्या भोसले ( वय 25 ) व धला उर्फ मोहिनी रामेश्वर भोसले (वय 22, रा. आष्टी, जि. बीड) यांना ताब्यात घेतले.त्यांची सखोल विचारपूस केली व अंगझडती घेतली. यावेळी  चोरी गेलेला काही माल त्यांच्याकडे मिळून आला.  तिन्ही आरोपींना अटक करून विचारपूस केली असता आरोपी ढेबऱ्या चव्हाण, रामेश्वर भोसले व कुकड्या उर्फ प्रफुल्ल भोसले ( रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड ) यांनी केल्याचे कबूल केले. 
आरोपी ढेबऱ्या चव्हाण, रामेश्वर भोसले  व एक महिला आरोपीस अटक करण्यात आली.
  त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकल (एम एच 23, बी. 1952), सॅमसंग कंपनीचा मोबाइल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा 1 लाख 62 हजार 70 रुपयाचा माल जप्त करण्यात आला. यातील अटक आरोपींवर यापूर्वीचे घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे 4 गुन्हे दाखल आहेत. 

Post a Comment

0 Comments