Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शेवगाव स्थानिक टपरीधारकांची नगर जिल्हा परिषदेसमोर उपोषण

 

👉शेवगाव जि. प. प्रा. शाळा, प्रा. आरोग्य केंद्र व पं.स. आवारात बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याची मागणी 
👉कार्यकारी अभियंता जि.प सा.बा दक्षिण विभाग यांनी दिले जि. प. सदस्य हर्षदा काकडे यांना लेखी पत्र 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - शेवगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची), प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती आवारात जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांनी सादर केलेल्या 2017 च्या प्रस्तावानुसार बीओटी तत्वावर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक टपरीधारकांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्या व शेवगावच्या जि. प. सदस्या हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हा परिषदेसमोर  उपोषण करण्यात आले होते.


जि.प. सदस्या काकडे यांची मागणी होती की शेवगाव येथील जि.प. शाळा मुलांची येथे शॉपिंग कॉम्लेक्स ( बी.ओ.डी ) तत्वावर बांधण्याबाबत शेवगाव  जि प प्राथमिक शाळेची सिस नंबर 16 29 ही जागा बांधा वापरा हस्तांतरित करा या बीओटी तत्वावर विकसीत करणे यास सर्वसाधारण सभेत प्राथमिक मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सादर प्रस्तावाबाबतची कारवाई चालू आहे.  याबाबत  दि.14 जून 2019 रोजी अहमदनगर यांना दिलेले नियोजनातील विषय मंजूर करण्याचे अधिकार जि प सर्वसाधारण सभेचे आहेत. याबाबत जि प सर्वसाधारण सभा जो निर्णय घेईल, त्यानुसार पुढील कार्यवाही  करण्यात येईल. यामुळेच आपण यम शुक्रवार  दि. 1 जुलै 2021 रोजी चे उपोषण  स्थगित करावे, असे  कार्यकारी अभियंता जि प आबा दक्षिण विभाग अहमदनगर यांनी असे लेखी पत्र दिले आहे. यामुळेच उपोषण तात्पुरते स्थगित  करण्यात आले आहे.
यावेळी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, शेवगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विनोद मोहिते, जनशक्ती विकास आघाडीचे शहराध्यक्ष सुनिल काकडे, संजय गुजर, अरविंद पटेल, विष्णू पाठे, रोहिदास गांगे, किशोर गरडवाल, कादर मनियार, सिराज शेख, संदिप राऊत, मोहंमद रफिक तांबोळी, बबलू तांबोळी, राजू वाकळे, भाऊसाहेब भाग्यवंत, रणजित शेळके, राधेश्याम मुंदडा, ज्ञानदेव सोनवणे, मधुकर वणवे, बबन घुगे, प्रल्हाद कांबळे आदिंसह टपरीधारक उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments