Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुलीचा पाठलाग करणाऱ्यास शेवटी न्यायालयाने दिली शिक्षा

 


👉  मुलीने व आईने न घाबरता दिली साक्ष
👉आरोपीविरूद्ध विनयभंग, धमकावणे, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यातील कलमांनुसार गुन्हा दाखल होता.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -  शाळकरी मुलीस पाठलाग करून सतत ञास देणा-याविरूद्ध मुलीने धाडसाने तक्रार दिली. न्यायालयात त्या मुलीने व आईने न घाबरता साक्ष दिली. अखेर न्यायालयाने आरोपीला २ वर्षे सक्तमजुरी आणि दंड केला आहे. संदीप नानासाहेब निकम (वय ३४ रा. गौतमनगर,राहुरी) असे आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी हा निकाल दिला.

राहुरी तालुक्यात २०१९ रोजी ही घटना घडली होती. आरोपी निकम एका शाळकरी मुलीचा पाठलाग करून सतत त्रास देत होता. ११ एप्रिल २०१९ रोजी  मुलगी  घराजवळच शाळेच्या बसची वाट पहात होती. यावेळी आरोपी हा तिच्याजवळ आला. त्याने त्याचा मोबाईल नंबर तिला देत तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फोन करत जा, असे सांगितले. मुलीने नकार दिल्यावर तिने वडिलांकडे तक्रार केल्याची खोटी धमकी दिली. मात्र, नंतर मुलीने त्याच्याशी संपर्क केला नाही. त्यामुळे ३० एप्रिल रोजी आरोपी निकम पुन्हा तिच्या घरी आला. फोन का केला नाही, अशी विचारणा करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर एक दिवशी ती दुचाकीवरून जात असताना तिचा पाठलाग करून छेड काढली. त्याही पुढे जाऊन १६ मे रोजी त्याने आणखी धाडस केले. त्या दिवशी दुपारी तो मुलीच्या घरी आला. त्यावेळी तिची आईही घरी होती. त्याला घराभोवती चकरा मारताना पाहून आईने हटकले. याचा राग येऊन त्याने मुलीच्या आईलाही शिवीगाळ केली, धमकी दिली.
हा प्रकार वाढतच असल्याचे पाहून मुलगी व आईने पोलिसांत तक्रार देण्याचे ठरविले. त्यानुसार त्या राहुरी पोलिस ठाण्यात गेल्या. तेथे फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी निकम याच्याविरूद्ध विनयभंग, धमकावणे, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा यातील कलमांनुसार गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी आरोपीला अटक केली. गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्याची सुनावणी अहमदनगरच्या सत्र न्यायालयात विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांचेसमोर झाली. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीत मुलगी, पिडीत मुलीची आई, पंच व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकीलांचा युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा दिली.

Post a Comment

0 Comments