Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सीसीटीएनएस प्रणालीमध्ये अहमदनगर जिल्हा पोलीस विभागाचा प्रथम क्रमांक

 
👉जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पोलीस कर्मचा-यांचा गौरव 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर- राज्यात नगर जिल्हा पोलिस दलाच्या सीसीटीएनएस विभागाने  यशस्वीपणे काम केल्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस दलात नगर पोलिसांची मान उंचावली आहे. या योगदानामुळे नगर सीसीटीएनएस विभागाच्या सर्व पोलिस कर्मचा-यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.12) गौरव करण्यात आला आहे. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके हे उपस्थित होते.

 राज्यात पोलीस प्रशासनात सीसीटीएनएस (क्राईम ॲण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम) प्रणाली सुरू झालेली आहे. यामध्ये सर्व राज्यातील पोलीस स्टेशन स्तरावरील संपूर्ण कामकाज या प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा पोलिस दलातील सीसीटीएनएस विभागाने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस सीसीटीएनएस विभागातील कर्मचारी सफौ आर.डी बारवकर, एस.एस जोशी,  पोना ए.के. गोलवड,  मपोना आर.व्ही. जाधव,  मपोकॉ एस.एस काळे,  के.पी ठुबे, एस.ए भागवत, टी.एल. दराडे आदिंसह पोलीस स्टेशन सीसीटीएनएस  ॲडमिन व इंजिनिअर अंबादास शिंगे यांनी  उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, सीसीटीएनएस प्रणालीमध्ये 1 ते 21 फॉर्मची विभागणी केलेली आहे. त्यांना सीईएस मंथलीमध्ये गुण देण्याची पद्धत आहे   सीईएस मंथली + सक्सेस स्टोरी + + सिटीजन सर्विस या सर्वाचे महाराष्ट्र पोलीस भागातून गुणांकन करण्यात येते. गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र ( पुणे) अप्पर पोलीस महासंचालक यांच्या पद्धतीनुसार महाराष्ट्रातील एकूण 48 युनिटमधून अहमदनगर जिल्ह्याचा गुणवत्तेनुसार 221 गुणांपैकी 197 गुण व 93 टक्के मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.  मार्च 2019 व एप्रिल मध्ये अनुक्रमे तिसरा क्रमांक प्राप्त झालेला होता. 2021 मध्ये अधिक परिश्रम घेऊन नगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला.
महिला बालकांविरुद्ध दाखल अत्याचाराच्या गुन्ह्याचे वेळेत (60 दिवसाच्या) आत तपास पूर्ण होऊन सीसीटीएनएस प्रणालीमध्ये समाविष्ट होतील, याकरता  गृहमंत्रालयाने दिनांक 21 एप्रिल 2018 रोजी आयटीएसएसओ  पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तुलनात्मक दर दर्शवण्यात येतो.  त्याचे अनुपालन करून महिला बालकाविरुद्ध दाखल अत्याचाराच्या गुन्ह्यांचे वेळेत प्रणाली अंतर्गत दाखल करून अहमदनगर जिल्ह्याचा करून अहमदनगर जिल्ह्याचा कमप्रेशन रेट वाढवत आहोत, असे यावेळी श्री पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments