Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना सैनिक फेडरेशन व शंभुसेनेचे विविध मागण्यांचे निवेदन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई  : महाराष्ट्राचे राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांची सैनिक फेडरेशन व शंभुसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेत आजी- माजी सैनिकांसह सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर व गडकिल्ले संवर्धनाबाबत चर्चा करून विशेष मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दि. 21 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता राजभवन येथे सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिगेडियर मा.आमदार, खासदार सुधीर सावंत, सैनिक फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, शंभुसेना प्रमुख व ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे वंशज  दिपकराजे शिर्के, सैनिक फेडरेशनचे कार्याध्यक्ष नारायण अंकुशे यांनी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आजी- माजी सैनिक, शंभुसेना पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनाद्वारे सैनिकांच्या व सामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर व गडकिल्ले संवर्धनाबाबत मागणी करत महाराष्ट्राचे राज्यपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली.
मागण्यात प्रामुख्याने सैनिक सरंक्षण कायदा करावा, शिक्षकांप्रमाणे सैनिकांना आमदारकीच्या दहा जगा राखीव जागा मिळाव्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (ग्रामपंचायत ते जिल्हापरिषद) सैनिकांना दहा टक्के राखीव असाव्यात, सैनिकांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, सैनिक कल्याण विभागात व मेस्कोत फक्त माजी सैनिकांनाच नोकरी मिळावी, 
युद्धात व सेवेदरम्यान शहीद जवानांच्या वीर नारी व त्यांच्या मुलांना हमीपुर्वक नोकरी मिळावी, सैनिकांसाठी सैनिक कल्याण विभागाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या योजना (CEA, ट्रॅक्टर योजना आदी अनुदान योजना) प्रत्येक्षात अंमलबजावणी करावी, 
ECHS मेंबर्स फक्त एम्पाल्ड हॉस्पिटलमध्ये ट्रेटमेन्ट न घेता भारतात कोठेही घेण्यासाठी मुभा असावी, 
CSD कॅन्टीन चे सामान भारतात कोठेही फ्लिपकार्ट/अमेझॉन प्रमाणे घरपोहच मिळावे, माजी सैनिकांना टोल माफी असावी, डिस्ट्रिट कलेक्टर यांच्यां माध्यमातून जिल्हावार सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कमिटीचे गठन व्हावे, मेस्को मधील कार्यरत माजी सैनिकांची वेतनवाढ व्हावी तसेच शेती संदर्भात व गड़किल्ले संवर्धन व्हावे अशा मागण्या केल्या आहेत. 
राज्यपालांना निवेदन देताना सैनिक फेडरेशन पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अनिल सातव, पुणे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव, सैनिक फेडरेशन संघटक पोपटराव दाते, जनरल सेक्रेटरी श्री. फ्लेक्चर पटेल आदींसह सैनिक पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments