Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अवैध गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्य साठा 3 वाहनासह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्ह्यात अहमदनगर व पुणे विभागीय भरारी पथकाची संयुक्त कारवाई

 
👉अहमदनगर यांचे श्रीरामपूर व राहाता परिसरामध्ये हातभट्टी दारु अड्ड्यावर छापे
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- अहमदनगर-कल्याण महामार्गावर भाळवणी शिवार (ता. पारनेर) येथे अवैधरीत्या गोवा राज्य निर्मित मद्य साठा वाहतूक करणा-या ३ वाहनासह २१ लाख ९१ हजार २०० रुपय किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोनजणांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभाग व विभागीय भरारी पथक पुणे विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,  दि.२३ जुलै २०२१ रोजी मिळालेल्या माहिती नुसार अहमदनगर-कल्याण महामार्गावर भाळवणी शिवार (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे अवैधरीत्या गोवा राज्य निर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याची बातमी मिळाली त्यानुसार वेगवेगळया ठिकाणी सापळा लावून एक टाटा कंपनीचा १६१३ मॉडेलचा सहा चाकी ट्रक ( एमएच १४ ए एस ९५३१), एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी वाहन ( एमएच १६ एमआर ९६३१) व एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर वाहन ( एमएच.०४ ई.डी. ३५८५) अशी तीन वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य, २ मोबाईल व इतर साहित्य असा मुद्देमाल आढळल्याने वाहनासह एकूण अंदाजे २१ लाख ९१ हजार २०० रुपय किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी  दिपक राधु गुंड ( वय ३९, रा. वडगाव गुंड, ता. पारनेर, जि. अहमदनगर), प्रकाश बाबाजी शेळके ( वय ३४, रा.कवाद कॅम्प, निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यास अटक करण्यात आली. तर राजु उर्फ राजेंद्र शिंदे हा गुन्हयातील मुख्यसुत्रधार फरार आहे.
उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,आयुक्त कांतीलाल उमाप,  पुणे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील ,  उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे, उपअधीक्षक  संजय सराफ, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगरचे दिंगबर शेवाळे, निरीक्षक, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे, भरारी पथक क्र.१ विभागाचे निरीक्षक ए.बी.बनकर, दुय्यम निरीक्षक कु. वर्षा घोडे,  विजय सुर्यवंशी, महिपाल धोका,  गोपाल चांदेकर, विभागीय भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक एस. व्ही. बोधे व  एस. आर. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.व्ही. चव्हाण, व्हि.एन. रानमळकर, आर. एम. पारधे,  जवान अहमद शेख, भरत नेमाडे, सतिश पोंदे, प्रताप कदम, अमर कांबळे, दिंगबर ठुबे, उत्तम काळे, नंदकुमार ठोकळ, प्रविण सागर, दिलीप पवार, अविनाश कांबळे, अंकुश कांबळे,  चालक संपत बिटके, पांडुरंग गदादे व  रत्नमाला काळापहाड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली. 
मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई), ८० (१) ८१, ८३, ९०, १०३ नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक, भरारी पथक क्र. १, अहमदनगरचे अजित बडदे, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक, पुणे विभागचे दुय्यम निरीक्षक एस. व्ही. बोधे  हे करीत आहे.

👉जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर यांचे श्रीरामपूर व राहाता परिसरामध्ये हातभट्टी दारु अड्ड्यावर छापे टाकण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपूर, कोपरगाव व संगमनेर विभागाची संयुक्त कारवाई करुन मोठया प्रमाणात श्रीरामपूर व राहाता येथील हातभट्टी दारु अड्ड्यावर धाडी टाकण्यात आल्या. हातभट्टी दारुसाठी लागणारे ४ हजार ८७० लिटर रसायन, ८३ लिटर गावठी दारु, व इतर असे इतर साहित्य मिळून १ लाख १६ हजार ९०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी साधना मोहन काळे व छाया सोनाजी शिंदे या दोन महिलांना अटक करण्यात आली असून एकजण फरार झाला आहे.
 आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्राचे कांतीलाल उमाप, पुणे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर अधीक्षक  गणेश पाटील, उपअधीक्षक एन. बी. शेंडे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अहमदनगर निरीक्षक एस. के. कोल्हे, ए.व्ही. पाटील, बी.टी. घोरतळे, एस.एस. पाडळे, डि. आर. वाजे, बी. बी. हुलगे तसेच दुय्यम निरीक्षक पी.बी. आहिरराव, ए.जे. यादव, बी. एस. कडभाने, एन. सी. परते, डि.वाय. गोलेकर, के.यु.छत्रे, एस.बी.भगत, एन. डी. कोंडे, व्ही. एम. बारवकर, सहा. दुय्यम निरीक्षक कंठाळे, साठे, गारळे, जवान सर्वश्री साळवे, उके, मुजमुले, लकडे, शेख, बर्डे, कर्पे, पाटोळे, निमसे, थोरात, मडके, बटुळे, महिला जवान जाधव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
 मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई) (फ) नुसार एकूण पाच गुन्हे नोंद केले असून पुढील तपास अहमदनगर निरीक्षक, राउशु, भ.प.क्र. २,  व निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव व श्रीरामपूर विभाग, अहमदनगर हे करीत आहे.  या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर अधीक्षक गणेश पाटील हे सहभागी होते.
 जिल्हयातील तीन वेगवेगळया ठिकाणच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध हातभट्टी अड्डे उध्वस्त करण्यासहच शासनाचा मोठया प्रमाणात महसूल बुडवून आणलेले गोवा बनावटीचे विदेशी मद्य बनावट लेबलसह जप्त करण्यात आल्याने अवैध व्यवसायीकांचे ढाबे दणाणले आहेत.


Post a Comment

0 Comments