Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बीडमध्ये आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल ; महिलेची तक्रार

 

👉 महिलेची तक्रार घेत नसल्याने थेट गृहमंत्र्यांनाच लिहिले होते पत्र
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बीड -  जिल्ह्यातील आष्टी तालुक्याचे आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आ. धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आ. सुरेश धस यांच्याविरुद्ध निवडणुकीत उभे असल्याचा राग मनात धरून धस आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्या हॉटेलची जेसीबीने तोडफोड केली असा आरोप या महिलेने केला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आष्टी पोलिसात आमदार सुरेश धस यांच्यासह तब्बल 38 समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. माधुरी मनोज चौधरी असं तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे.


2017 साली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली होती. या निवडणुकीमध्ये सुरेश धस यांच्या पॅनलच्या विरोधात पांढरी येथील माधुरी चौधरी या त्यांच्या विरोधात निवडणुकीला उभ्या होता. याचाच राग मनात धरून सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पती मनोज चौधरी यांच्यावर खोट्या तक्रारी देऊन मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप तक्रारदार महिलेकडून करण्यात आला आहे.
👉अनेक वेळा तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे या महिलेने थेट गृहमंत्री यांना पत्र लिहिले होते. 19 जुलै रोजी रात्री सुरेश धस आणि त्यांचे समर्थक पांढरी येथे या महिलेच्या संपत्तीची तोडफोड केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर आष्टी पोलिसांनी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments