Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुटखा विक्री करणाऱ्यावर कर्जत पोलिसांचा छापा ; आरोपीस 3 दिवस पोलीस कोठडी

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत -  बिटकेवाडी कर्जत ते श्रीगोंदा या रस्त्यावरून दुचाकीवर हिरापान मसाला, टोबॅको तंबाखूचे वेगवेगळे पुडे घेऊन जाणा-यास कर्जत पोलिसांनी पकडले. आरोपी याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. 11 जुलै 2021 रोजी कर्जत ठाण्याचे  पो. नि. चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली की, बिटकेवाडी कर्जत ते श्रीगोंदा या रस्त्यावर एक स्कुटी मोटासायकलस्वार हिरा गुटखा विक्री करणारा हिरा गुटखा घेऊन कर्जतकडे येत आहे, अशी माहिती मिळाली. श्री यादव यांनी  तात्काळ पोलीस पथकाला त्या ठिकाणी पाठविले. पोलिस पथकाने सूचनेनुसार  बिटकेवाडी शिवारात  हॉटेल न्यू साईजवळ रोडवर थांबले असता, एक स्कुटी गाडी येताना दिसली,  हात दाखवून थांबण्याचा इशारा  देऊन थांबविले. त्या स्कुटी चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने सय्यद फारुक आमीन (वय 19  रा. खडकत ता. आष्टी जि. बीड) असे सांगितले. त्यास पांढरे रंगाचे गोणीत काय आहे. असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी पोलीस अंमलदार यांना सदर गोणीचा संशय आल्याने सदर गोणी दोन पंचांसमक्ष पाहणी केली. त्यात हिरापान मसाला, टोबॅको तंबाखूचे वेगवेगळे पुडे दिसले.  दोन पंचांसमक्ष पंचनामा केला असता एकूण 5 हजार 554 रू किमतीचा एमआरपीनुसार  हिरापान मसाला मिळून आला.  रोख 2 हजार 300 रू व 25 हजार रू हिरो कंपनीची पांढरे रंगाची डेस्टिनी 125 मोटासायकल, अस एकूण 32 हजार 854 रू किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस अंमलदार यमगर यांनी दोन पंचांसमक्ष जागीच पंचनामा करून आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेतले. 
  सय्यद फारुक आमीन याचेविरुद्ध कर्जत पोलिस ठाण्यात भादवि कलम 328 ,188, 272, 273, व अन्न व सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26 (2) (iv)27, 30 ,(२)23 प्रमाणे पोलिस अंमलदर सुनील खैरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.  आमीन याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अमलदार सुनील माळीशिखरे हे करत आहेत.
 कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी  आण्णासाहेब जाधव, कर्जत पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव , सपोनि सुरेश माने , पोकाॅ पांडुरंग भांडवलकर,भाऊसाहेब यमगर, सुनील खैरे, विकास चंदन, श्याम जाधव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments