Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सागर कर्डिले याच्यासह दोनजण 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : अनेक दाखल गंभीर गुन्ह्यांची पोलिस प्रशासनाने दखल घेऊन सागर कर्डिले याच्यासह दोनजणांवर 15 महिन्यासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.

नगर  जिल्ह्यातील संघटितपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमविणे,  दुखापत करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्ता अडवून मारहाण करणे या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे भंग करणे असे गंभीर स्वरूपाचे शारीरिकविरुद्धचे गुन्हे अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलिस ठाणे परिसरातील हद्दपार टोळीतील टोळी प्रमुख सागर विठोबा कर्डिले (वय 34 रा. वारूळवाडी ता. जि. अहमदनगर), सचिन उर्फ लखन मंजाबापू वारुळे (वय 28) व गणेश गोरख साठे (वय 29) टोळीतील याना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर जिल्ह्यातून 15 महिन्याकरता हद्दपार केले आहे. 
दि. 20 नोव्हेंबर  2020 रोजी सपोनि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात यांनी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत तसेच अहमदनगर शहर परिसरातील संघटित गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारी टोळीविरुद्ध हद्दपारीची कारवाई व्हावी, या करता पोलीस ठाण्यात हद्दपार टोळी प्रस्ताव क्रमांक 1/ 2020 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करून प्रस्तावमधील चारजणांविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षाकरता हद्दपार करणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले होते. गंभीर गुन्हे दाखल असल्याने व संघटित गुन्हे करणारे टोळीतील टोळी प्रमुख सागर विठोबा कर्डिले आणि सचिन उर्फ लखन मंजाबापू  व गणेश गोरख साठे ( तिघे रा. वारूळवाडी, ता. जि. अहमदनगर) यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तसेच अहमदनगर शहर परिसरात सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताच्या व मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी तसेच सदर टोळीची सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी, टोळीचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर टोळीचे टोळी प्रमुख व टोळीतील दोन सदस्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार कारवाई करून 15 महिन्याकरिता अहमदनगर जिल्हा हद्दीतून दि. 15 जुलै 2021 हद्दपारीचा अंतिम कारवाईचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी पारित केला आहे. 

Post a Comment

0 Comments