Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावकाराने व्याजाच्या पैशापोटी ओढून नेलेली गाडी मालकास परत ; कर्जत पोलिसांची अभिनंदनास्पद कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

कर्जत-  व्याजाच्या पैशापोटी बळजबरीने ओढवून नेलेली चारचाकी गाडी सावकाराकडून तक्रारदारास पुन्हा मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कर्जत पो.नि.चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकाराने पोलीस कर्मचा-यांनी केली. यात पोलीस कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, संबंधितास न्याय मिळवून दिल्याबद्दल विशेषातः कर्जत पोलिसांचे अनेक सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे. या घटनेमुळे काहीअंशी पोलीस प्रशासनाकडे नागरिकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदतच होईल. यासर्व घडामोडीचे खरेतर श्रेय हे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनीच जाते.


या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, कर्जत पोलीस स्टेशनचे पो. नि चंद्रशेखर यादव  यांनी कर्जत तालुक्यातील विनापरवाना चालणारे सावकारकी व्यवसायबाबत नागरिकांना बिनधास्तपणे पुढे येऊन तक्रार करा असे आवाहन केल्याने राशीन नजीक राहणारे सचिन विलास पाटील (रा. काळेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हे दि 26 जून 2021रोजी कर्जत पोलीस स्टेशन येथे आले. त्यांनी सांगितले की, मी सुमारे एक वर्षांपूर्वी परीटवाडी येथील एका सावकाराकडून व्यावसायिक कामाकरिता दोघांनी प्रत्येकी 6 लाख रुपये 5 टक्के व्याजाने घेतले होते. मी त्या सावकारास वेळेवर व्याज देत होतो. परंतु माझ्या पैशाची वेळेत परत फेड न झाल्याने त्या सावकाराने माझे मागे व्याजाचे पैसे आताच पाहिजेत, असा तगादा लावून माझे मालकीची 15 लाख रुपये किमतीची फॉरचूनर गाडी ( क्र. एमएच 12 केडब्ल्यू 0025) ही काही महिन्यांपूर्वी त्याचे पैसे दिले नाही म्हणून बळजबरीने ओढून नेली आहे. मला आता खूप मानसिक त्रास झाला असून मानसिकता खूप बिघडली आहे. साहेब माझी तक्रार घ्या व मला न्याय द्या, असे भावूक होऊन सचिन पाटील यांनी पो. नि. चंद्रशेखर यादव यांना आपली तक्रार सांगितली.  पो.नि.यादव यांनी लागलीच त्यांचे तक्रारीची दखल घेत, राशीन पोलीस दुरक्षेत्राचे पोउपनि भगवान शिरसाठ ,पोह तुळशीदास सातपुते,पोकॉ गणेश भागडे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे अशांना सदरची हकीकत सांगून तात्काळ त्या सावकारास कर्जत पोलीस स्टेशनमध्ये बोलवा असा तोंडी आदेश दिले.  पोलीस कर्मचारी यांनी त्या सावकारास पोलीस ठाण्यात बोलावून समक्ष हजर केले.  यानंतर त्या सावकाराने मी त्याची गाडी तात्काळ परत करतो असे सांगितले.  सदरची गाडी त्याने  तात्काळ परत केली.
 कर्जत पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव व पोलीस स्टाफचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक  मनोज पाटील  अप्पर पोलीस अधिक्षक  सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पोनि चंद्रशेखर यादव, सपोनि भगवान शिरसाठ,पोह तुळशीदास सातपुते,  पोकॉ गणेश भागडे, सागर म्हेत्रे,संपत शिंदे आदिंच्या पथकाने ही कारवाई  केली आहे.

Post a Comment

0 Comments