Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आंतरजिल्हा प्रक्रियेने नगर जिल्ह्यात नव्याने 104 पोलीस कर्मचारी

 

👉 नगर जिल्ह्यात लवकरच दोन दिवसात बदली प्रक्रिया !
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर - जिल्हा पोलिस दलात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेने दुसऱ्या जिल्ह्यातून 104 नव्याने पोलीस कर्मचारी आले आहेत. नगर जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसात बदल्या होण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जलदगतीने कार्यवाही सुरू झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.
यापूर्वीच नगर जिल्हा पोलिस दलात पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदोन्नत्या दिल्या आहेत. तर आता जिल्ह्यात नव्याने आंतरजिल्हा प्रक्रियेने 104 कर्मचारी आले आहेत. तसेच अनेक दिवसांपासून बदल्या प्रक्रियेबाबत नगर पोलिस दलात चर्चा सुरू आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या बादल्या कार्यवाही दोन दिवसात पूर्ण करण्यासाठी जलदगतीने जिल्हा पोलिस  प्रशासनात हालचाली सुरू आहेत. या होणारे बदल्या प्रक्रियेकडे संपूर्ण  जिल्हा पोलीस दलाचे लक्ष केंद्रित झाले आहे.
👉नुकत्याच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेबाबत तक्रार आल्यास त्याची जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील  दखल घेणार आहेत. 
👉नगर जिल्हा पोलिस दलात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असणारे लसचा पहिला डोस हा 96 टक्के तर दुसरा डोस हा 81 टक्के पोलिस कर्मचा-यांनी घेतले आहेत. 
👉जिल्हा पोलिस दलात 19 कर्मचारी कामावर उपस्थित नाहीत, त्यांचा जिल्हा पोलिस दलाकडून शोध घेतला जात आहे.

Post a Comment

0 Comments