Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याना गुणपत्रिकेबरोबर च मिळणार सनद

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
औरंगाबाद  -  प्रत्येक वेळी मार्च, एप्रिल महिन्याम ध्ये दहावीच्या परीक्षा घेतल्या  जातात. माध्यमिक  व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या  10 वी बोर्ड परीक्षा निकालनंतर आतपर्यंत  आठ दिवसाच्या अंतराने गुणपत्रक विद्यार्थ्यांना  मिळत होते. आता मात्र निकालानंतर मिळणाऱ्या गुणपत्रिकारबरोबरच सनद देण्यात  येणार असल्याचे बोर्ड सूञांनी माहिती दिली आहे.
मार्च-एप्रिल महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात.  परंतु गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यभरातील शाळा महाविद्यालय बंद आहेत. तर दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे यंदा परीक्षा रद्द करत नववीच्या मूल्यांकनावर आधारित दहावीचा निकाल जाहिर करण्यात आला. यावेळी मूल्यांकनाची पद्धत बदलल्याने अनेक अडचणी बोर्डासह शाळांना आल्या आहेत. नुकतेच लागलेल्या निकालातील त्रुटी दूर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना देखील काही शंका असल्यास दाद मागण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान या लागलेल्या निकालाचे गुणपत्रक येत्या दहा-बारा दिवसांत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबरोबरच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर सनदसाठी वाट पहावी लागत असे ती सनद गुणपत्रिकेबरोबरच देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments