Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोबाईल शॉपी’ फोडून मोबाईल चोरणारे चोरटे अटक ; एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर ः  नेवासा तालुक्यातील सलीम मोबाईल शॉपी’ या बंद दुकानाचे छताचा पत्रा काढून दुकानामधील 53 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरणारे जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. गणेश विठ्ठल आव्हाड, (वय 23, रा. गजानन कॉलनी, नवनागापूर), सलीम शौकत सय्यद (वय 23, रा. एमआयडीसी, नगर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथील ‘सलीम मोबाईल शॉपी’ हे मोबाईलचे दुकान बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा काढून दुकानामधील 53 हजार रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरुन नेले होते. या घटनेच्या सलीम सांडू शेख याचे फिर्यादीवरून नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दाखल गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात आले. या गुन्ह्याबाबत आरोपी गणेश आव्हाड याला चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे देवून लागला. यानंतर त्याला अधिक विश्वासात घेऊन गुन्ह्याचे अनुषंगाने कसून चौकशी केली असता, हा गुन्हा त्याने व त्याचा साथीदार सलीम सय्यद ( रा. तामसवाडी, ता. नेवासा, ह.रा. एमआयडीसी, अ.नगर) असे दोघांनी मिळून केला असल्याची कबुली दिली. यावरून आरोपी सलीम शौकत सय्यद ( ह. रा. एमआयडीसी, अ.नगर) यांस ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींना गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईल बाबत विचारपूस केली असता, आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेले 10 मोबाईल व इतर साहित्य असा एकूण 53 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल काढून दिला, तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली बजाज डिस्कव्हर ( एमएच 20, डीए 6798) असा एकूण 1 लाख 8 हजार 90 रुपये किमतीच्या मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. 
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, सफी मन्सूर सय्यद, संतोष लोढे, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, आकाश काळे, शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, मच्छिन्द्र बर्डे, प्रकाश वाघ, रविद्र घुंगासे, विजय धनेधर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments