Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सहजयोग ध्यान नित्य नियमाने केल्यास संतुलन प्राप्त होते - गणेश भुजबळ

 

👉आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आरमर्ड कॅम्प भिंगार येथे सहजयोग ध्यान कार्यक्रम संपन्न
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आरमर्ड स्टॅटिक वर्कशॉप मिल्ट्री कॅम्प भिंगार येथे प. पु. माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवार, अहमदनगर च्या वतीने सर्व सैनिका साठी सहजयोग ध्यानाची माहिती व जागृतीचा कार्यक्रम घेण्यात आले या वेळी कर्नल कमांडेंट तरूण कालीया, ले.कर्नल उप कमांडेंट विनोद कुमार गवई व दंडपाल मेजर बेहरे उपास्थित होते.

सदर कार्यक्रम सहजयोग परिवारातील सदस्य गणेश भुजबळ यांनी सहजयोगा बद्दल माहिती देतांना सांगितले सहजयोग हा जगातील पाठीवरचा असा योग आहे की याची अनुभूती व प्रचिती तक्षणी येते. ही ध्यान साधना नित्य नियमाने केल्यास मानवाला संतुलन प्राप्त होऊन मनशांती मिळते. सहजयोग ध्यान साधना ही संपूर्ण भारतभर तसेच जगातील 140 देशा पेक्षा जास्त देशात विनसायास केले जाते. या योग साधने मध्ये कोणत्याही जाती धर्माच्या व पंताच्या माणसाला ही ध्यान साधना करता येते. सहजयोग ध्यान साधना विनामूल्य स्वरूपात शिकवली जात असून याचे कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
यावेळी सहजयोगी कुंडलिक ढाकणे यांनी उपस्थिताना माताजींच्या परम कृपेत कुंडलिनी जागुती दिली व याची अनुभूती अनेक साधकांना मिळाली असल्याचे मान्य केले. शेवटी सहजयोगी अभय ठेंगणे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर स्वागत अंबादास येन्नम यांनी केले.
Post a Comment

0 Comments