Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीत विनाकारण फिरणा-यावर कारवाई ; प्रशासन रस्त्यावर

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी :अनलॉकनंतर पाथर्डी शहरातील बाजार पेठेतील दुकानासह रस्त्यावर विनाकारण फिरणारे व गर्दी करणाऱ्या नागरिकांवर पाथर्डी तालुका प्रशासन बुधवार (दि.९ ) पासून कारवाई केली. यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसिलदार शाम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे, मुख्याधिकारी धंनजय कोळेकर आदिंनी रस्त्यावर उतरून बेशिस्त नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला.


दरम्यान, मुख्य बाजार पेठेत दुकानात विना मास्क असणारे, विनाकारण गर्दी, दुचाकीवरून हिरोगिरी करत फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. शासनाने अनलॉकचा निर्णय घेतांना ठरवलेले निर्बंधस्तर हे साप्ताहीकी पॉझीटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडची एकून उपलब्धता यावर आधारित घेतलेला आहे. त्यामुळे कोरोना संपला आहे असे नाही.
बुधवारी सकाळी  शहरातील वसंतराव नाईक चौक, अजंठा चौक, क्रांतीचौक , नवीपेठ , शेवगाव रोड आणि जुन्या  बस्थानाक परिसरात प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पायी फिरून दुकानदारांना गर्दी होणार नाही. दुकानात असलेल्या ग्राहकांनी व मालकाने मास्कचा वापर करून सामाजिक अंतर ठेऊन सँनिटयझरचा वापर करण्याच्या सक्तीच्या सूचना केल्या आहेत. 

Post a Comment

0 Comments