Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये संस्थेच्या सल्लागार समितीची बैठक

 

👉२०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षाकरिता अॅडमिशन देण्याबाबत.
👉 नवीन शैक्षणिक धोरण काय, याबाबत चर्चा 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु।। येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये येथे २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षाकरिता अॅडमिशन देणे संदर्भात व नवीन शैक्षणिक धोरण काय आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी संस्थेची सल्लागार समितीची बैठक पार पडली.
या बैठकीस न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बुद्रुक अध्यक्ष बाळासाहेब जपे पा., मुख्याध्यापक बी आर आंबेडकर व समितीचे सदस्य राजेंद्र आगलावे पा., विकास जपे पा., कैलास सदाफळ पा., गणेश कापसे पा. आदिंसह सर्व शिक्षक उपस्थित होते.
या बैठकीत नवीन वर्षाकरिता ५ वी ते १० पर्यंत अॅडमिशन देण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळेस सर्वांनी न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर येथे प्रवेश घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांना व विद्यार्थी पालकांना संस्थेची सल्लागार समितीने केली आहे.

Post a Comment

0 Comments