Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बनाव रचून पोलिसांना कामाला लावले ! ; अखेर फिर्यादीवरच गुन्हा दाखल

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - फिर्यादीनेच बनवा रचून पोलिस ठाण्यात येऊन गुन्हा दाखल केला. यानंतर तपासअंती हा बनवा उघड झाल्याने फिर्यादीवरच पोलिसांनी बनाव रचून पोलिसांना कामाला लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, गुरुवारी २७ मे रोजीच्या रात्री श्रोगोंदा तालुक्यातील घोडगाव येथील सागर शंकर निंबोरे (वय ३०) हा कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद द्यायला आले होते. यावेळी निंबोरे याने कर्जत तालुक्यात दुरगाव फाटा येथे दुचाकीवर आलेल्या दोघांनी आपल्याला अडवून मारहाण केली आणि आपल्याकडील मोबाईल, १ लाख रुपये चोरून नेले, अशी तक्रार केली. याबाबत कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निंबोरे याच्या तक्रार व वर्तनाचा संशय घेतला. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सूचना देऊन तक्रारदार निंबोरे यांनी दिलेल्या तक्रारीबाबत दाखल गुन्ह्याची सर्व बाजूंनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पथक घटनास्थळी जाऊन आले. परंतु, त्या ठिकाणी पोलिसांना धागेदोरे मिळाली नाहीत. यामुळे कर्जत पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांकडून निंबोरे याची माहिती घेतली. सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने
यांच्याकडे तपासाची सूत्रे सोपविण्यात आली. निंबोरे याच्याविरुद्ध खुनासह दरोडा, फसवणूक, चोरी असे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तक्रार देताना निंबोरे त्याचे मामा गोरख नभाजी दरेकर यांच्यावर संशय असल्याचे नोंदवून घ्या, असे वारंवार सांगत होता. त्यामुळे पोलिसांनी मामाच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे ठरविले.
पोलिस निंबोरे याला घेऊन त्याच्या मामाच्या घरी म्हणजे श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे गेले. तेथे मामी नंदाबाई दरेकर भेटल्या. त्यांनी वेगळीच माहिती दिली. निंबोरे हा २५ मे रोजी दरेकर यांच्या घरी आला होता त्याने दरेकर यांचा मतीमंद मुलगा दीपक याच्यावर मोबाईल चोरीचा आळ घेऊन मारहाण केली होती. त्याच्या जखमाही त्यांनी पोलिसांना दाखविल्या. मोबाईलसाठी निंबोरे याने घराची झडती घेतल्याचेही सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर समजले की त्याचे मामा-मामी शेताच्या वाट्याचे पैसे देत नाहीत, याचा राग त्याला होता. त्याच रागातून त्याने मामाला अडकविण्याचा प्रयत्न केला.
ही चौकशी सुरू असताना आता आपले बिंग फुटले, हे लक्षात आल्यावर निंबोरे याने तेथूनच धूम ठोकली. पोलिसांनी त्याच्याविरुद्धच बनाव रचून पोलिसांना कामाला लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments