Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत भाजप युवा मोर्चातर्फे गरजूंना प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे पा यांच्या हस्ते वाटप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचा वाढदिवस विविध सेवा वस्तीत जाऊन गरजू नागरिकांना किराणा सामानाचे वाटप भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सचिन तांबे यांनी चंद्रकांत दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन दादा हे साईबाबांचे निस्सीम साईभक्त असून ते नेहमी शिर्डीत साईदर्शनासाठी येतात सर्व सामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारे व सदैव स्वतः कार्यकर्त्याच्या भूमिकेत असणारे नेते अशी त्यांची ओळख असल्याचे मत सचिन तांबे यांनी व्यक्त केले 
याप्रसंगी आकाश त्रिपाठी,लखन जव्हेरी,बबलू वर्पे ,आकाश वाडेकर,मोहन क्षत्रिय,आदित्य वारुळे,हितेश अष्टेकर यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments