Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हातगावात दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात झंज पितापुत्र जखमी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव - अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे शनिवारी पहाटे अज्ञात दरोडेखोरांनी झंज यांच्या घरात प्रवेश करून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात दिलीप रामराव झंज (वय 65), प्रकाश दिलीप झंज (वय 31) दोघे पितापुत्र जबर जखमी झाले. त्यांना पुढी उपचारासाठी नगरला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर सोनेचांदीच्या मौल्यवान दागिन्यासह मोठा ऐवज लंपास झाला झाल्याच्या घटनेमुळे मोठी घबराट निर्माण झाली आहे.


याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती हातगाव येथील झंज कुटुंब गावात भर वस्तीत राहत असून शनिवारी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास राहत्या घराचा दरवाज्या तोडून घरात प्रवेश दरोडेखोरांनी सामानाची उचकपचक करून मौल्यवान वस्तू रोख रक्कम लंपास केल्या जात असताना दिलीप झंज, प्रकाश झंज यांनी दरोडेखोरांशी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी पितापुत्रावर सशस्त्र हल्ला केल्याने दोघे रक्तबंबाळ झाले डोक्यात धारदार हत्याराने वार केले आहे आरडा ओरड करताच दरोडेखोरांनी पोबारा केला दोघांचा प्रयत्न तोकडा पडला गेला ग्रामस्थांनी जखमींना पुढील उपचारासाठी शेवगावला हलविण्यात आले मात्र डोक्याला जबर मार असल्याने गंभीतर परिस्थिती झाल्याने अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 
ग्रामस्थांनी घटनेची माहिती बोधेगाव पोलिसांना दिली मात्र कोणीच घटना आले नाही सकाळी उपनिरीक्षक पावरा,शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, यांनी भेट दिली 
झंज यांच्या घरात जखमीचे रक्तरक्तश्राव झाल्याने पसरल्याचे दिसून आले आहे या घटनेत रोख रक्कम,सोनेचांदीच्या वस्तू गायब झाल्या आहेत मात्र तपशील समजू शकले नाहीं या बरोबरच सत्यनारायण साखरे, बबन गोसावी, मगर, अभंग, गहिनीनाथ अभंग, यांच्या घरी दरोडेखोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला आहे पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.
संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments