Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पूर्वग्रहदूषित ठेवून तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याकडून रेणुकामाता स्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामी : संदीप वाळूंज


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- केडगाव येथील रेणुकामाता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले कोविड सेंटर हे अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या परवानगीने सुरू होते. ते चालविण्यासाठी कोणत्याही बनावट प्रमाणपत्रांचा वापर केलेला नाही. तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी पूर्वग्रहदूषित ठेवून कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा न करता रेणुकामाता स्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामी सुरु केली आहे. यासंदर्भात आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत, असे पञकारांशी बोलताना संदीप वाळूंज यांनी सांगितले.
श्री. वाळूंज पुढे म्हणाले की, रेणुकामाता स्पेशालिटी हॉस्पिटलला बॉम्बे नर्सिंग अॅक्टची परवानगी तसेच सेंटर मिळण्याकरिता डॉ. प्रीती हांगे यांनी अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज दाखल केला होता. परंतु लगेचच कोविड महामारीचे संकट सुरू झाले. त्यामुळे बॉम्बे नर्सिंग ॲक्टची परवानगी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याचे लक्षात येताच, कोविड केअर सेंटर हॉस्पिटलसाठी महापालिकेकडे रीतसर परवानगी मागितली. महानगरपालिकेने कोविड केअर सेंटरसाठी परवानगी दिली.
रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलतर्फे कायदेशीर परवानगीनंतर कोविड केअर हॉस्पिटल म्हणून सुरू केले होते. तेथे फक्त कोविड पेशंटवरच उपचार करण्यात आले. तसेच हॉस्पिटल तर्फे कुठल्याही बनावट प्रमाणपत्रांचा वापर केलेला नाही. तसेच रेणुकामाता मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे कोविड पेशंट कमी झाल्याने बंद करण्यात आले आहे, असेही वाळुंज यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments