Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

योगामुळे मिळणारी मन:शांती मनुष्याला मानसिक व्याधीपासून दूर ठेवते : मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार

 


छावनी परिषद अहमदनगर. छावनी परिषदेने आयोजित केली ऑनलाइन योग कार्यशाळा 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर 
भिंगार : नित्याने केला जाणारा योगअभ्यास आणि ध्यानधारणा , प्राणायाम यामुळे प्राप्त होणारी मन:शांती मनुष्याला मानसिक व्याधी पासून दूर ठेवते. त्याचबरोबर आत्मशक्ति मध्येही निश्चित सुधारणा होते.धकाधकीच्या जीवनात नित्य योगसाधनेला प्रत्येकाने महत्व द्यायला हवे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी विद्याधर पवार यांनी छावनी परिषद आयोजित आँनलाइन योग कार्यशाळेत केले. 
Be with Yoga Be at Home या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त आँनलाइन योग,ध्यानधारणा व प्राणायामाची प्रात्यक्षिके आर्ट आँफ लिव्हिंगचे योगशिक्षक रामचंद्र लोखंडे यांनी आपल्या घरूनच सहभागी झालेल्या सर्वाकडून करवून घेतली. 


पवार पुढे म्हणाले, योग भारतीय सांस्कृतीची अमुल्य देणगी असून योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान निश्चित वाढला आसून योगामुळे श्वास,मन आणि शरीर यांचा उत्तम समन्वय साधून आत्मविश्वासाने वाढण्यास निश्चित मदत होत असते. 
योग एक कला आहे. मानवाच्या कोणत्याही प्रकारच्या शारिरीक व्याधीवर योगामुळे मात करता येते. म्हणून योगाची दैनंदिन जीवनात नीत्य आवश्यकता असल्याचे मत योगशिक्षक रामचंद्र लोखंडे यांनी यावेळी सांगीतले. आँनलाइन योगकार्यशाळेस कार्यालय अधिक्षिका उज्वला पारनाईक,महेंद्र सोनवणी, रमेश साके,सुनिल शिंदे गणेश भोर, डॉ. गीतांजली पवार,राजेंद्र भोसले,योगेश बोरूडे,अमोल कुलट यांचेसह छावनी परिषदेचे अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय शिंदे यांनी तर आभार महेश भगत यांनी मानले तांत्रिक बाब अभिषेक शहाणे यांनी सांभाळली.

Post a Comment

0 Comments