Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अजंठा चौक ते चिंचपुर रोड डीपीपर्यंत डांबरीकरण व्हावेत ; पाथर्डी सा.बां.चे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - येथील अजंठा चौक ते चिंचपुर रोड डीपीपर्यंत डांबरीकरण व्हावेत, अशी मागणी पाथर्डी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे नागनाथ गर्जे, सुनिल पाखरे, मनोज गांधी, सुरेश हुलजुते, विलास पटेल आदिंसह नागरिकांनी केली आहे.

निवेदनात, अजंठा चौक ते डीपीपर्यंतचा भाग अंदाजे अंतर १००मीटर असुन मुख्य बाजारपेठेचा भाग आहे. उपजिल्हा रुग्णालय, नियोजित पाथर्डी-बीड रस्ता तसेच तिर्थक्षेत्र मोहटादेवी व तारकेश्वरगडकडे जाणा-या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले असून पावसाळा सुरू झाल्याने पाण्याचे डबके साचत आहेत. साचलेल्या पाण्यात घाणीचे किडे, डास व डेंग्युचे डासही तयार होऊ शकतात. ऊन पडले की, सुकलेल्या रस्त्यावरील धुळीचे कण बाजारपेठेतील लोकांच्या येणा-या वाहनांच्या रहदारीमुळे धुळ उडून नाकात डोळ्यात जाऊन आरोग्य धोक्यात येऊन दृष्टीदोषासारखे आजार व दम्यासारखे आजार होऊन फुफ्फुस निकामी होऊन जीवीतहानी घडू शकते. त्यामुळे सदर प्रकार हा जनतेचे जीवन संपवणारे आहे. संबंधित ठेकेदार कंपनीकडून आपले अधिकार वापरत तात्काळ काम करुन घ्यावे. कोट्यावधी रुपयांचे निधी सदर रस्त्यास प्राप्त झालेले आहे. सदर मागणीचा जनहितार्थ लक्षात घ्यावी, अन्यथा विविध प्रकारचे आंदोलन किंवा मानवीय जीवन अधिकारा अंतर्गत जनहित याचिका दाखल करू, असे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments