Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेशनिंगचा गहू व तांदूळ काळ्याबाजार प्रकरणात ८ जणांना दि.२४ पर्यंत पोलिस कोठडी


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- शहरामध्ये रेशनिंगचा गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्रीस घेऊन जाणा-या प्रकरणामध्ये पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. यात दोनजण फरार असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्या सर्वांना दि. 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अटक करण्यात केलेल्या आरोपींमध्ये गणेश श्रीनिवास झंवर, जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, सुभाष पागिरे, सागर अशोक नांगरे, सुरेश रासकर, भगवान छत्तीसे, आदिनाथ चव्हाण अशी नावे आहेत. या प्रकरणांमध्ये संग्राम रासकर, आसाराम रासकर हे दोघेजण अद्यापही फरार आहे.

नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात शनिवारी (दि.१९) कोतवाली पोलिसांच्या व जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने रासकर यांच्या दुकान व गोदामवर छापा टाकून 42 लाख रुपयांचा काळ्याबाजारात जाणारा रेशनचा गहू व तांदूळ हा जप्त केला आहे. या छाप्यात चारचाकी गाड्या सुद्धा पोलिसांनी जप्त केल्या असून, मार्केटयार्डमधील सुरेश ट्रेडिंग कंपनी व केडगाव इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या गोडावूनला पोलिसांनी सील ठोकले आहे.
लॉक डाऊन च्या काळात जे गहू व तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे  मार्केटयार्ड परिसरामध्ये सुरेश रासकर यांचे सुरज ट्रेडिंग कंपनी व सोहम ट्रेडिंग कंपनी या नावाची फर्म आहे ते तर यांचे धान्य ठेवण्यासाठी चे गोडाऊन हे केडगाव इंडस्ट्रीज मध्ये आहे. सदर ठिकाणी काळा बाजार होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर काल त्यांनी रासकर यांच्या दुकानावर व गोडाऊन वर छापा टाकून 42 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केलेला आहे. या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे.
 कोतवाली पोलिसांनी मार्केट यार्ड येथे घडलेल्या गुन्ह्यासंदर्भात मध्ये वेगळा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सहा आरोपी आहे तर केडगाव येथे गोदामासंदर्भात दुसरा गुन्हा स्वतंत्र असा दाखल केला असून त्यामध्ये चार आरोपी आहे एकूण या प्रकरणांमध्ये दहा आरोपी असून आज व काल पोलिसांनी आठ जणांना अटक केली. या प्रकरणांमध्ये दोन जण अद्यापही फरार आहे.
पकडलेल्या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता रासकर यांच्याकडे सापडलेल्या गहू व तांदूळ यांच्या गोण्याची तपासणीत पोलिसांना करायची आहे . मध्यप्रदेश, हरियाणा या ठिकाणाहून ज्यांनी हा माल आणला असल्याचे सांगितले आहे. तो नेमका त्याच्याकडून आणला आहे का? याची सुद्धा खातरजमा करायची आहे. तसेच माल कुठून कसा आणला व कोणाला विकला गेला याचा सुद्धा पोलिसांना तपास करायचा आहे.या प्रकरणांमध्ये अन्य कोणाकोणाचा समावेश आहे, याची सुद्धा पोलिसांना माहिती द्यायची आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी  असल्यामुळे यांच्याकडे असणारे बिलबुक तसेच यांची रोजमेळ ची वही हेसुद्धा पोलिसांना हस्तगत करायची आहे. संगणकावर असलेल्या नोंदणी या केल्या आहेत की नाहीत याचा सुगावा पोलिसांना छडा लावायचा आहे. त्यामुळे आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद न्यायालयांमध्ये करण्यात आला, न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या आठ आरोपींना दिनांक 24 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

Post a Comment

0 Comments