Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ ते वडगाव रस्ता 'राजकीय श्रेया' साठीच रखडला ! नागरिकांमध्ये आमदार राजळेंसह स्थानिक पुढा-यांवर नाराजी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
पाथर्डी- पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ ते वडगाव रस्त्याची दयनीय अवस्था अनेक वर्षापासून झाली आहे. रस्त्यात मोठी खड्डे झाली असून यात पावसाचे पाणी साचल्यास वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. याबाबत अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी रस्ता दुरुस्तीसाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे. परंतु 'राजकीय श्रेय कोणी घ्यायचे' या स्पर्धेतून या एकाच मुद्द्यावरच स्थानिक नागरिकांच्या जवळ्याचा प्रश्नाकडे राजकीय पुढारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.
आता स्थानिक आमदारांसह जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य चिंचपूर पांगुळ ते वडगाव आणि ढाकणवाडी रस्त्यावर दाखवा व एक हजार मिळवा' अशी जाहिरात करण्याची वेळ स्थानिक नागरिकांवर आली आहे. यापुढील काळात परिसरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांकडे आमदारांसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व स्थानिक पुढार्‍यांनी लक्ष न दिल्यास मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा चिंचपूर पांगुळ, वडगाव व ढाकणवाडी येथील परिसरातील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments