Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सराफ कुलथे खूनप्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद ; बीड एलसीबीची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
बोधेगाव - शिरूर कासार येथील सराफा व्यावसायीक विशाल कुलथे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड यास मंगळवारी (दि.1) पहाटे नाशिक येथून ताब्यात घेतले. ही कारवाई बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि.भारत राऊत यांनी केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलिसांची मोठी मदत मिळाली.
शिरुर येथील विशाल कुलथे या सराफा व्यापार्‍याचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड ज्ञानेश्‍वर गायकवाड ( भातकुडगांव ) आणि त्याचे साथीदार धीरज मांडकर ( पाथर्डी ) व केतन लोमटे ( भातकुडगांव ) यांची नावे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांना शिरुरच्या न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. सोनाराचा खुन करून त्याचा मृतदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव शिवारातील दत्तात्रय गायकवाड यांच्या शेतात पुरण्यात आला होता. 
आरोपी लोमटे यांनी सदर ठिकाण दाखविले. शिरूर पोलिसांनी शेवगाव तालुका महसूल, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मातीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला होता. यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ भैय्या गायकवाडचा पोलीस शोध घेत होते. अखेर मंगळवारी पहाटे नाशिक येथून त्यास ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत व त्यांच्या टीमने केली. यामध्ये त्यांना नाशिक पोलिसांची मदत मिळाली.
संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments