Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

काॅग्रेसचे पाथर्डीत महागाई विरोधात 'ढोल बजाव ' आंदोलन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी :केंद्रामधील भाजपा सरकारने पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, खते व बी- बियाणाची मोठी दरवाढ केली आहे. सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांना वेठीस धरले.या महागाईच्या विरोधात बुधवारी (दि.९) तालुका काँग्रेस कमिटीने काँग्रेस कार्यालयापासून ते खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंपापर्यंत महागाई विरोधात 'ढोल बजाव ' आंदोलन केले. दरम्यान केल्या.तहसिलदार शाम वाडकर यांना महागाईचे निवेदन देण्यात आले.


आंदोलनात पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा अहमदनगर अल्पसंख्याक काँग्रेस  जिल्हाकार्याध्यक्ष नासिर शेख, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जालिंदर काटे, नवाब शेख,  तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रकाश शेलार, रवींद्र पालवे, वसंत खेडकर, गणेश दिनकर, दिगंबर सोलाट,अकबर पटेल, अनिल साबळे, गीते पाटील, धनराज घोडके, सिद्धार्थ खेडकर, राजु क्षेत्रे,  अक्षय सरोदे , रोहिदास खेडकर, संपत क्षेत्रे, सिकंदर शेख, अनंत शेळके, ज्ञानेश्वर ढोले, सुभाष क्षेत्रे उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी  केंद्र सरकारच्या गलथान कारभारा विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments