Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माझी वसुंधरा स्पर्धेत कर्जत नगर पंचायत गटात राज्यात द्वितीय तर मिरजगाव ग्रामपंचायत ही राज्यात द्वितीय

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत :-माझी वसुंधरा या महाराष्ट्र शासनाच्या पहिल्या वर्षीच्या स्पर्धेत नगर पंचायतीच्या गटात कर्जत नगरपंचायतने दैदिप्यमान यश मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. तर मिरजगाव ग्रामपंचायतने ग्रामपंचायत गटात द्वितीय क्रमांक मिळवून तालुक्याची मान राज्यात उंचावली, दि 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त ऑनलाइन निकाल राज्याच्या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.


माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने 2020-21 यावर्षा मध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थेची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये नगरपंचायतीच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांमध्ये कर्जत नगरपंचायतीने सर्वांच्या सहकार्याने केलेल्या कामामुळे राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला. तर ग्रामपंचायत गटामध्ये मिरजगाव ग्रामपंचायतीस राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन संरक्षण व जतन करण्यासाठी या दोन्ही गावाने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दि 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री
बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थितीत झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात ही बक्षीसे जाहीर करण्यात आली. या स्पर्धेच्या ऑनलाईन
कार्यक्रमासाठी नगरपंचायत कर्जतच्या प्रशासक तथा प्रांताधिकारी अर्चना नष्टे, मुख्याधिकारी गोविंद जाधव तर मिरजगाव ग्रामपंचायतीचे वतीने गट विकास अधिकारी अमोल जाधव मिरजगावच्या सरपंच सौ खेतमाळीस व ग्राम विकास अधिकारी प्रताप साबळे हे ऑनलाईन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी केले. 
कर्जत नगरपंचायतीमध्ये माझी वसुंधरा स्पर्धे अंतर्गत शहरातील सर्व सामाजिक संघटनांनी व आम्ही कर्जतचे सेवेकरी या टीमनी उभारलेल्या श्रमदान चळवळीचा मोठा हातभार लागला आहे, राज्यातील कोणत्याही नगर पंचायतीस अथवा ग्राम पंचायतीस एवढा लोकसहभाग मिळाला नसेल एवढे मोठे काम कर्जत मध्ये उभारले गेले. मात्र राज्यात पहिला क्रमांक येन्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले. कर्जत नगर पंचायतीने या अगोदर जलसंवर्धन व जलयुक्त शिवार अंतर्गत राज्यात तिसरा क्रमांक मिळवला होता, आता या दुसऱ्या क्रमांकाने कर्जतच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे. 
कर्जत नगर पंचायतीच्या या यशात सर्व लोक प्रतिनिधी, सर्व अधिकारी, विविध सामाजिक संघटना, सर्वसामान्य नागरिक, महिला, मुले, पत्रकार या सर्वांनीच मोठ्या उत्साहात सहभाग घेतला त्या सर्वांच्या एकीमुळे हे यश मिळाले असल्याच्या भावना कर्जत मधून व्यक्त केल्या जात असल्या तरी अपेक्षित यश मिळू न शकल्याने काहीशी निराशा ही निर्माण झाली असून पुढच्या वर्षी अधिक जोमाने कामाला लागू असा विश्वास सर्वानी व्यक्त केला आहे.
कर्जत नगर पंचायतीच्या या कामात आ. रोहित पवार यांनी मोलाचा सहभाग नोंदवला वेळोवेळी त्यांनी स्वतः व त्याच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी वेळोवेळी श्रमदानात सहभाग घेतला याशिवाय विविध झाडे उपलब्ध करून देणे, लावलेल्या झाडांना ड्रीप देणे, विविध स्पर्धाच्या लॉंचिंगसाठी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमास मदत करणे, सुशोभीकरणासाठी विविध टायर उपलब्ध करून देणे, शहरात विविध राष्ट्रपुरुषाचे चित्रे रेखाटने आदी सह इतर वेगवेगळ्या प्रकारची मदत उपलब्ध करून दिली, तर कर्जत नगर पंचायतीच्या नुकत्याच कार्यकाळ संपलेल्या पदाधिकारी व नगर सेवक यांनी ही विशेष परिश्रम घेतले होते यामध्ये प्रथम नगराध्यक्ष नामदेवराव राऊत, नगराध्यक्षा प्रतिभाताई भैलूमे यांनी माजीमंत्री प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विविध विकास कामासह जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे व इतर विकास कामा मुळेही या स्पर्धेतील यशाला विशेष हातभार लागला आहे. माझी वसुंधरा स्पर्धेच्या पंधराशे गुणांपैकी एक हजार गुणांचे काम आमच्या कार्यकाळात पूर्ण झाले असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. 
या स्पर्धेचा निकाल लागल्यानंतर सर्व सामाजिक संघटनाच्या श्रमप्रेमीनी एकत्र येत मोठा जल्लोष केला मात्र प्रत्येकाच्या मनात पहिला क्रमांक हुकल्याची रुखरुख पहावयास मिळत होती. आम्ही कर्जतचे सेवेकरी च्या सदस्यांनी नगर पंचायतसमोर जल्लोष केला, यावेळी अनेक जण उपस्थित होते. कर्जत मधील सर्व श्रमप्रेमीनी अधिक जोमाने कामाला लागण्याचा निश्चय जाहीर केला. यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त करताना अधिक जोमाने काम करायचे असल्याचे म्हटले.
संकलन : आशिष बोरा, कर्जत

Post a Comment

0 Comments