Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मोबाईल चोरणारा चोरटा मुद्देमालासह अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -   घरातून मोबाईल चोरणारा चोरटा मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. गणेश दिवाणजी काळे (रा. वाकोडी फाटा, नगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोहेकाँ फकीर अब्बास शेख, विश्वास बेरड, पोना शंकर चौधरी, दिपक शिंदे, पोकों कमलेश पाथरुट, मयुर गायकवाड चपोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, घराचा दरवाजा उघडा ठेवून बाहेर गेलो होतो. या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने परवानगीविना राहत्या घरातून दोन माझे मोबाईल चोरुन घेवून गेले आहेत, या रणजितसिंग छोटेलाल यादव ( रा. वाकोडी फाटा, नगर ) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
सदरचा हा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना श्री कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा गणेश दिवाणजी काळे (रा. वाकोडी फाटा, नगर) यांनी केला असून तो सध्या वाकोडी फाटा येथे आलेला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. पथकाने वाकोडी फाटा येथे जावून शोध घेतला असता, आरोपी गणेश दिवाणजी काळे यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल काढून दिल्याने तो जप्त करुन पुढील तपासासाठी आरोपी मुद्देमालासह पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापूर्वी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गणेश दिवाणजी काळे याचे विरुध्द दाखल गुन्हे
 भिंगार कॅम्प पोस्टे. गुरनं. T११७/२०१७ भादवि कलम ४५७,३८०, ३४,भिंगार कॅम्प पोस्टे. गुरनं. १२१/२०१७ भादवि कलम ४५७,३८०, तोफखाना पो.स्टे. गुरनं. १५२/२०१७ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८०, ३४ धुळे दाखला आहे.

Post a Comment

0 Comments