Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर महापालिकेत उलटी गंगा ; आता सेनेचा महापौर तर राष्ट्रवादीचा उपमहापौर

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -  अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश भोसले यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज मंगळवारी (दि.२९) दाखल केले. यानंतर मंगळवारी दुपारपर्यंत कोणी दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. त्यामुळे बुधवार (दि. 30) महापौर व उपमहापौर निवडणुकीत शेंडगे व भोसले हे बिनविरोध झाला असून फक्त  औपचारिकता बाकी आहे.


 महापौर व उपमहापौरपदासाठी मंगळवार मंगळवार (दि. 29) दुपारपर्यंत पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होते. महापौरपदासाठी शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे यांनी  तर राष्ट्रवादी काँग्रेस गणेश भोसले यांचे एकमेव उमेदवारी अर्ज भरले.
 दरम्यान राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे हे अहमदनगरला आले होते. यावेळी श्री काकडे यांची आमदार अरुण जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 
 नगरसेवकांशी चर्चा झाली. नगरमध्ये पहिल्यांदाच शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करीत आहेत. यामुळे अहमदनगर शहरात 'नगर महापालिकेत उलटी गंगा' अशी चर्चा नगर शहरात सुरू झाली आहे

Post a Comment

0 Comments