Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली ; आता पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार ; राऊत


 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नाशिक - आधीच्या आघाड्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाची वाटणी व्हायची. पण आता पाच वर्षे शिवसेनेकडेच मुख्यमंत्रीपद राहणार आहे. यामध्ये कोणतीही वाटाघाटी होणार नाही, शिवसेना खासदार संजय राऊत सध्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्या नाशिक येथे त्यांनी पत्रकार परिषद भाष्य केले. शरद पवारांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या भाषणात हेच म्हटले आहे. आमच्या कुणाच्या मनात अशी शंका नाही. फक्त प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून वक्तव्य केले. महाविकास आघाडीमध्ये कोणतीही नाराजी नाही काँग्रेसमध्ये नाराजी नाही,असे राऊत म्हणाले.

👉मराठा आरक्षणाबाबत मोदी निर्णय घेतील

राऊत म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. त्यावर आता ते पुढील निर्णय घेतील. विरोधकांनी महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये. एक मराठा लाख मराठा दिल्लीत दिसायला हवा. 'मराठा आरक्षण मार्गी लावण्यात काढण्यात येणारा मोर्चा दिल्लीत काढायला हवा. आरक्षणाबद्दल आम्ही हात जोडून विनंती केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील,' अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

राऊत पुढे म्हणाले, आगामी काळात, कोणत्या दिशेने जायच आहे, त्यानुसार काम सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रचे योगदान महत्वाचे आहे. आगामी निवडणुकीमध्ये सुद्धा सत्ता पुढे न्यायची असेल तर उत्तर महाराष्ट्र साथ गरजेची आहे. शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षात कायम बदल होतात,मात्र घडी बसवली आहे,बदल करण्याची गरज वाटत नाही. हळूहळू संघटनेचे काम चांगले होत आहे. अनुभवी लोकांची समिती स्थापन करू. देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहे. त्यांच्या विरोधात नवी आघाडी निर्माण केली तर बरोबरीची लढाई लढता येईल. पण, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, राऊत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments