Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

...पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही काय भिकारी आहोत का?” : उर्जामंत्री नितीन राऊत आक्रमक


👉आम्ही जे संविधानात्मक आहे, जे भारतीय राज्यघटनेने दिले आहे. तेच आम्ही मागतो आहे. 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याला आमचा विरोध नसून, पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही काय भिकारी आहोत का?” असा सवाल उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केला आहे. मराठा आरक्षण व पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या दोन मुद्द्यांवरुन नितीन राऊत यांनी आक्रमक इशारा दिला आहे.
काँग्रेस नेते तथा उर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पदोन्नतीतील आरक्षणाच्या संबंधित अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, व्ही जे, एनटी यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मते काय आहेत, हे जाणून घेणार आहेत.
आम्ही जे संविधानात्मक आहे, जे भारतीय राज्यघटनेने दिले आहे. तेच आम्ही मागतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. मात्र त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये. आमचं भांडवल करून तेच फक्त काम करु शकतात, आम्ही करु शकत नाही, अशी भूमिका घेऊ नये, अशी टीकाही नितीन राऊत यांनी केली आहे.
आम्ही अजून हातात बांगड्या घातलेल्या नाही. तसेच आम्ही भिकारी नाही, असेही नितीन राऊत म्हणाले. 

Post a Comment

0 Comments