Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुंबईतील धोकादायक व्हिडिओ ; कार जमिनीत झाली गडप


100 वर्षे जुन्या विहिरीत पार्क होती कार
 ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतलेली असताना एक धोकादायक व्हिडिओ मुंबईतून समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये घरासमोर उभी असलेली कार काही सेकंदांमध्ये जमिनीत गडप झाल्याचे दिसत आहे. तिथेच राहणाऱ्या नागरिकांनी हा थरारक व्हिडिओ कॅमेरात कैद केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात आहे. दरम्यान मुंबईकरांची अवस्था सांगणारा एक थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्रॅफिक डिपार्टमेंटनुसार, ही कार घाटकोपर परीसरात राहणाऱ्या डॉ. पी दोषींची आहे. त्यांनी सांगितले की, ही घटना सकाळी 8.30 ची आहे. कंपाउंडमध्ये काम करणाऱ्या एका मुलाने सांगितले की, त्यांची कार थोडी तिरकी झाली आहे. आम्ही बालकनीमध्ये पोहोचलो. आमच्या डोळ्यांसमोर कार खड्ड्यात बुडाली.
डॉ. दोषी यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक पंपच्या सहाय्याने पाणी काढले जात आहे. BMC चा पंप आला आहे. क्रेनच्या माध्यमातून कार बाहेर काढली जात आहे. डॉ. दोषींनुसार, जेथे कार बुडाली आहे तिथे पहिले एक विहीर होती. ही विहीर जवळपास 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी होती. नंतर त्या विहिरीवर स्लॅब टाकून झाकण्यात आले होते. तरीही ही दुर्घटना घडली.

Post a Comment

0 Comments