Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माणिकदौंडी कोविड सेंटरमधून अवघ्या १३ महिन्याच्या बाळासह आई सुखरुप घरी !

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- माणिकदौंडी लोकसहभाग कोविड सेंटरमध्ये गेल्या सात दिवस बाळासह आई ही दोघे कोरना आजारावर उपचार घेत होती. अवघ्या १३ महिन्याचं बालक या आजारावर मात करून पूर्णपणे बरे झाले तसेच त्या बालकाची आई ही पूर्णपणे बरी हाऊन सुखरुप घरी गेले आहेत. दरम्यान, उपचार देणा-या आरोग्यदूताच्या हस्ते आई व बाळाला सेंटरच्या वतीने साडी व कपडे दिले.
यावेळी माणिकदौंडीचे उपसरपंच समीर सर, तलाठी मेरड भाऊसाहेब, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सूनीलभाऊ पाखरे, पोलीस पाटील वसंत वाघमारे, डॉ. प्रियंका फुंदे, आरोग्यसेवक प्रकाश पवार, कोल्हे मॅडम, अशोक कांबळे, कोविड सेंटरचे आचारी अंजुम पठाण व संचालक मोहनराव दाते आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments