Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी ज्योती गडकरी

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर
अहमदनगर : तोफखाना पोलीस ठाण्यास नव्याने पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांची नियुक्ती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली आहे. पो.नि. गायकवाड यांच्याकडून श्रीमती गडकरी यांनी पदभार स्वीकारला. 
श्रीमती गडकरी यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत होत्या. त्या कर्तृत्व दक्ष अधिकारी म्हणून त्यांची पोलिस विभागात ख्याती आहे. अहमदनगर शहरात कोतवाली नंतर तोफखाना पोलीस ठाण्याकडे शहराच्या कायदा सुव्यवस्थेचा दृष्टीने महत्त्वाचे पाहिले जाते. यामुळेच मोठ्या विश्वासाने श्रीमती गडकरी यांची कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने तोफखाना पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे. नव्याने आलेल्या पो.नि गडकरी या हजर झाल्याने आता या तोफखाना परिसरातील गुन्हेगारांवर वचक निर्माण करतात, ते पाहू या. Post a Comment

0 Comments