Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते बचत गटांना ५० लाखांचे धनदेश वाटप

 

👉महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचे अफगाणिस्तानच्या काँसुलेट जनरल श्रीमती झाकिया मॅडम यांनी केले कौतुक
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - राहुरी येथील प्रतिभा लोकसंचलित केंद्रात आयोजित कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते बचत गटातील महिलांना ५० लाखांचे धनदेश वाटप करण्यात आले. यावेळी तसेच उपस्थित महिला बचतगट सदस्यांना मास्क, सॅनिटायझर, वाटप करण्यात आले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अफगाणिस्तानच्या काँसुलेट जनरल श्रीमती झाकिया मॅडम यासह मान्यवर उपस्थित होते.


भारत व अफगाणिस्तान येथील महिलांना करिता विविध व्यवसाय कसा करता येईल तसेच अफगाणिस्तानच्या झाकिया यांनी गटांचे व सीएमआरसीचे कामकाज जाणून घेतले. महिला करत असलेल्या उद्योग व्यवसाय विषयी माहिती घेतली. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचे कौतुक केले. अफगाणिस्तान महिलांसाठी हे एक मैत्रीचे नवे पर्व असेल असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी स्वीय सहायक रफी केलीवाॅल, वुमन पाॅवर असोसिएशनच्या अध्यक्षा अर्चना शर्मा, पदाधिकारी डेझी डेवरी, रिमा कपूर, वर्ल्ड ट्रेड सेंटर नवी मुंबईचे मानद सल्लागार जयेश खाडे, स्पिरीच्युअल हिलर, सुभी लिम्का बुक अॅवाॅर्डी मधु लखोटीया, राहुरी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा रेखाताई तनपुरे, आयसीआयसी नाशिक विभागाचे वैभव भाटिया, सीआरआरसी कार्यकारणी व राहुरी सीएमआरसी व जिल्हा कर्मचारी वर्ग आदिसह महिला बचतगट मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यालयाचे जिल्हा समनव्य अधिकारी संजय गर्जे, सहा जिल्हा समनव्य अधिकारी सुनिल पैठणे, गजानन ढोणे लेखाधिकारी, दीपक लुते प्रकल्प सल्लागार,तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीएमआरसीच्या अध्यक्षा पुष्पाताई धनवटे,  व्यवस्थापक महेश अबुज, सहयोगिनी कल्पना काळे, चुंबलकर, पवळे, खरात, शेख, ढसाळ, क्षेत्रीय समनव्यक राणी पगारे, वंदना आल्हाट, भारती देशमुख आदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments