Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विविध घटकांचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेस प्राधान्य दिले - सतीश इंगळे

 
मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने अभिवादन
ऑनलाईन न्यूज नेटवर्क

नगर रिपोर्टर 

अहमदनगर - राजश्री छत्रपती शाहू महाराजांची शिक्षण, सामाजिक, समता, जाती निरपेक्षता यांच्याकडे पाहण्याची दृष्टी ही खूप वेगळी व तेजस्वी होती. शिक्षण, समाज, धर्म, हक्क, अर्थ अशा विविध घटकांचा विचार करून राजर्षी शाहू महाराज लोकसेवा करीत असत. कुणावरही न विसंबता स्वत:च स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा; स्वंयप्रेरणेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी समाजसेवेला अधिक महत्व देऊन समाजातील सर्व घटकांना त्यांचे हक्क मिळवे, ही त्यांची भावना होती. आपल्या राज्य कारभारातही त्यांनी वंचित घटकांना स्थान देऊन त्यांचा उद्धार केला. असे आदर्शवत व्यक्तीमत्व पुढील काळातील अनेक महान नेत्यांचे प्रेरणास्थान राहिले आणि यापुढेही राहतील, असा विश्‍वास मराठा नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सतीश इंगळे यांनी केले.छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजि.सुरेश इथापे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष सतीश इंगळे, संचालक ज्ञानदेव पांडूळे, उदय अनभुले, मानद सचिव राजेंद्र ढोणे, अमोल लहारे, प्रियंक बेलेकर, श्रीकांत निंबाळकर, केशव हराळ, विजय बेरड, अशोक वारकड, बबन सुपेकर, गोरक्ष काटे, अनुपमा भापकर, रणजित रक्ताटे, शशिकांत बोरुडे आदि उपस्थित होते.
इंजि. सुरेश इथापे म्हणाले, शेकडो वर्षे जे ज्ञान, सत्ता, संपत्ती यापासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा शाहू महाराजांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता.राजकीय स्वराज्य मिळविण्याचा प्रश्‍न त्यांना गौण वाटला. सामाजिक व धार्मिक समतेची प्रस्थापना करण्याच्या प्रश्‍नाला त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला. लोकनेता राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक वेळा आपले विचार लोकांच्या समोर अत्यंत प्रखरतेने व प्रगटपणे मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र ढोणे यांनी केले तर आभार उदय अनभुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments