Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

'डिजिटल मीडिया'च्या पत्रकारांची बदनामी नको ; अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई व्हावी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
महा डिजिटल मीडिया असोसिएशन पुणे जिल्ह्याच्या वतीने  अमित बगाडे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना डिजिटल मीडिया च्या पत्रकारांची बदनामी करण्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे बाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे.  

महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य डिजिटल माध्यमाच्या पत्रकारांची बदनामी करण्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे बाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे महा डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्ययांच्याकडे व्हाट्सअप या सोशल मीडिया माध्यमातून माजी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांच्या नावाने खोटा संदेश व्हायरल करून डिजिटल माध्यमाच्या पत्रकारांची बदनामी करण्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणे बाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे त्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की आम्ही आपणाकडे तक्रार दाखल करतो कि, गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्हाट्सअप च्या माध्यमातून माजी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राजवर्धन राठोड यांच्या नावाने अनेक ग्रुप वर " बोगस पत्रकार कार्यवाही" या हेडिंगच्याखाली डिजिटल माध्यमाच्या पत्रकारांची बदनामी होईल अशा प्रकारचे संदेशा लिहून हे संदेश पत्रकारांच्या ग्रुपमध्ये व्हायरल केल्या जात आहेत.
 आपणास कळवू इच्छितो की, डिजिटल मीडिया पत्रकारांना प्रेस काउंसलिंग ऑफ इंडियाच्या सर्व तरतुदी लागू असल्याबाबतची अधिकृत अधिसूचना तसेच देशातील सर्व डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांसाठी डिजिटल मीडियाच्या गाईडलाईन्स 2021 च्या माध्यमातून नियमन करायला सांगितलेले आहे. नुकतीच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतातील सर्व डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांची माहिती सुद्धा मागवलेली आहे. थोडक्यात सांगायचे असल्यास डिजिटल मीडिया पत्रकारांना मुख्य प्रवाहातील पत्रकारांचा दर्जा दिलेला आहे.
सदरील व्हायरल होणाऱ्या खोट्या संदेशामध्ये माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री म्हणून कर्नल राजवर्धन राठोड यांचे नाव टाकलेले आहे. खरे पाहता कर्नल राजवर्धन राठोड हे सप्टेंबर 2017 ते मे 2019 या कालावधीमध्ये केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री होते. सध्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री माननीय प्रकाश जावडेकर हे असून दिशाभूल करणारी माहिती माजी केंद्रीय मंत्रालयाच्या नावाचा वापर करून पसरवली जात आहे आणि हा अत्यंत गंभीर प्रकार आहे.
 मी व्यक्तिशः माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राजवर्धन राठोड यांच्या कार्याला संपर्क करून तीन वर्षांपूर्वी अशा प्रकरणाचं कोणतं वक्तव्य करणं राजवर्धन राठोड यांनी केलं होतं का याबाबत विचारणा केली असता अशा प्रकारे कोणतेही वक्तव्य राजवर्धन राठोड यांनी केले नसल्याची माहिती मला मिळाली.
डिजिटल मीडिया माध्यमाच्या पत्रकारांना कोणत्याही प्रकारच्या शासकीय जाहिराती मिळत नाहीत हे सर्व डिजिटल माध्यमाचे पत्रकार व्यवसायिक लोकांकडून तसेच काही स्थानिक व्यापाऱ्यांकडून जाहिराती घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. मात्र अशा प्रकारच्या खोट्या व्हायरल झालेल्या संदेशामुळे डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या अनेक पत्रकारांना नैराश्य आलेले असून अनेक निर्णय किंवा फ्रंटलाईन वर्करच्या बाबतीत सकारात्मक बातम्या करण्याचं काम सुद्धा डिजिटल माध्यमाच्या पत्रकारांनी केलेले आहे. कोणत्याही प्रकारच्या शासकीय सुविधा मिळत नसताना सुद्धा नागरिकांना अपडेट माहिती पोहोचवण्याचं काम डिजिटल माध्यमांनी केलेले आहे.
डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांनी विषय खोटे मेसेज व्हायरल करणाऱ्या सर्व लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी, जेणेकरून भविष्यात कोणताही व्यक्ती फुकट असलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे फेक संदेश फसवणार नाही. महा डिजिटल असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अद्वैत चव्हाण सर यांनी पोलीस महासंचालकाकडे निवेदन दिले आहे व असे देखील सांगितले आहे निवेदनासोबत कर्नल राजवर्धनसिंह राठोड यांच्या नावे व्हायरल होत असलेल्या फेक मेसेजचा स्क्रींशोट जोडलेला आहे.


Post a Comment

0 Comments