Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बेघर मनोरुग्णांसाठी करत असलेले काम समाजासाठी दिशादर्शक - महापौर बाबासाहेब वाकळे

 

अर्थवेध इन्वेसमेंटच्यावतीने मानगांव प्रकल्पास धान्य  रोख रक्कम
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर:- आज समाजातील वंचितांसाठी काम करणार्यांसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहेमाणगाव येथील मानवसेवा प्रकल्प खर्या अर्थाने बेघर मनोरुग्णांसाठी करत असलेले काम समाजासाठी दिशादर्शक आहे.  अशा संस्थांना मदत केल्याने त्यांचे कार्य अधिक व्यापक होऊनसमाजातील बेघर मनोरुग्णांना माणूसकीचा निवारा मिळणार आहेया संस्थेस मदत करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम भडके परिवाराने केले आहेअशीच मदत प्रत्येकांने केल्यास संस्थेचे काम चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होईलअसे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
 अर्थवेध इन्वेसमेंटचे संचालक प्रसाद भडके यांच्या मातोश्री मंजुळा विनायक भडके यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मानगांव येथील मानवसेवा प्रकल्पास धान्य  रोख रक्कम देण्यात आलीयाप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळेएन.जे.चे मॅनेजर सचिन राणेगिरिश शिंदेदत्ता जाधवअमित दारकुंडेदिलीप गुंजाळविनायक नेवसेसानिया भडके आदि उपस्थित होते. याप्रसंगी एन.जे.चे मॅनेजर सचिन राणे म्हणालेवाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा आनंदच वेगळा आहेआपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने कार्य करणार्या संस्थांना मदत दिली पाहिजेमानसेवा ही संस्था बेघर मनोरुग्णांसाठी करत असलेले कार्य कौतुस्पदआहे.     यावेळी मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात औषध सेवा पुरविणारे गिरिश शिंदे  अमित दारकुंडे यांचा तर मानव अधिकार संघटनेच्या शहराध्यक्षपदी निवड झालेले विनायक नेवसे यांचा गौरव करण्यात आलाकार्यक्रमाचे सूत्रसंचालन पैनाना डोंगरे यांनी केलेआभार प्रकल्पाचे दिलीप गुंजाळ यांनी मानलेकार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल धोत्रेसानिया भडकेविरेंद्र भावसारकानिफनाथ कदमरोहन नायडूसलीम सय्यदसिराज शेखसागर शिंदेसंतोष पिंपरकर आदिंनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments