Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने खून : एकास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर -दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने व त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात केस करण्यासाठी जाणार, या कारणातून खून करणाऱ्या आरोपीस पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. मिनीनाथ उर्फ सोनू बळीराम बिज्जा (वय २७, रा. लोंढेवस्ती, नालेगाव अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दिलीप देवराम विरंदकर (रा ठाणगेमळा अहमदनगर) हे वडील दि. 16 जूनला ४.३० ते ६.३० वाजण्याच्या दरम्यान नगर कल्याणरोड अमरधामच्या पाठीमागे बाभळीच्या झाडाखाली शेडमध्ये मिनीनाथ उर्फ सोनू बळीराम बिज्जा (रा. लोंढेवस्ती, नालेगाव) यास दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने व त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात केस करण्यासाठी जाणार, या कारणावरून आरोपी बिज्जा याने माझ्या वडिलांना लाकडी दांडक्याने व डोक्यामध्ये दगड घालून जीवे ठार मारले, या राहुल दिलीप विराम देकर याने दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं ४२१/२११ कलम ३०२ प्रमाणे कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आरोपी हा गणेशनगर नेप्तीनाका,अहमदनगर या परिसरात आला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने सापळा लावून आरोपी सोनू बिज्जा याला पकडले. पोलीस खाक्या दाखविताच, आरोपी याने गुन्ह्याची कबुली दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ संदीप घोडके, पोना संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, लक्ष्‍मण खोकले, पोकाॅ संदीप चव्हाण, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, सागर सुलाने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments