Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्रकार सूर्यकांत वरकड यांना पीएच. डी. जाहीर

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - हातोळण (ता. आष्टी, जि. बीड) येथील पत्रकार सूर्यकांत मोहन वरकड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मराठी विषयातील पीएच. डी. पदवी जाहीर केली. अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्रातून त्यांनी "निवडक संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयक अभंगांचा अभ्यास' या विषयावरील प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. अहमदनगर महाविद्यालयातील मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी त्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, प्रा. डॉ. शिरीष लांडगे, डाॅ. संदीप सांगळे, डॉ. प्रकाश सूर्यवंशी, प्रा. डॉ. पोपट सिनारे, प्रा. डॉ. महेबूब सय्यद, दै. प्रभात चे निवासी संपादक विठ्ठल लांडगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ.सूर्यकांत वरकड हे सध्या नगरमधील दै. प्रभातमध्ये उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत.


Post a Comment

0 Comments