Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनोरुग्ण मुलाकडून आई - वडिलास बेदम मारहाण ; वृध्द आई मयत तर वडिलांवर नगर येथे उपचार सुरू

 

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : एकीकडे फादर्स डे उत्साहात साजरा करण्यात येत आहे.मात्र दुसरीकडे मनोरुग्ण मुलाने आपल्या वृध्द आई-वडिलास काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथे घटना घडली आहे. उपचारा दरम्यान वृध्द आईचा मृत्यू झाला असून, वडिलावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी प्रत्येकजण त्यांच्या उतारवयात त्यांना कमीत कमी काम व त्यांचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आज बदलत्या काळात देखील फादर्स डे सारखे उपक्रम राबवून त्यांचा सन्मान केला जातो. मात्र एकीकडे हे सर्व करत असतानाच दुसरीकडे आपल्या वृध्द माता पित्यास काठीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. यातील जखमी वृध्द दाम्पत्यास सुरूवातीला पाथर्डी येथील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र,येथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नगर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान वृध्द आईचा मृत्यू झाला, तर वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे. 

Post a Comment

0 Comments