Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आरटीओ भ्रष्टाचार प्रकरण : नाशिक आरटीओ प्रादेशिक भरत कळसकर यांच्यावर ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप ; ईडी, सीबीआयकडून चौकशीची मागणी

 

👉राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांची चौकशी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात मुख्य अधिकाऱ्यांपासून तर परिवहन मंत्र्यांपर्यंत गंभीर आरोपांच्या प्रकरणात राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे या वरिष्ठ अधिका-याचे जबाब शहर गुन्हे शाखेने नोंदविले असून श्री ढाकणे यांची सुमारे ६ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ७ शासकीय अधिकारी, एक अशासकीय एकूण ९ जणांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत.

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पदोन्नतीच्या बदल्यांबाबत आर्थिक देवाण-घेवाणीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या सुमारे १४ पानी तक्रार या विभागातील वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी पंचवटी पोलिसांकडे दिली आहे. तक्रारीत करण्यात आलेले आरोप व ज्याचा भ्रष्टचार केल्याबाबत प्रकरणांमध्ये नामोल्लेख केला गेला आहे, त्या संबंधिताचे पदे पाहता नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासअंती या प्रकरणाशी संबंधित ७ अधिकाऱ्यांना नोटीस देऊन चौकशी केली आहे. श्री.ढाकणे यांनाही नोटीस बजावण्यात आली होती. शनिवारी सकाळी शहरातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात श्री ढाकणे उपस्थित झाले होते. पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची याप्रकरणाविषयी चौकशी करून जबाब नोंदविला आहे. त्यांच्या कार्यालयाकडून झालेल्या पत्रव्यवहार व आदेशांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याचेही आदेश दिले आहेत. 
मोटर वाहन निरिक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाखांची वरकमाई केली जात असल्याचा आरोप नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांच्यावरसुध्दा करण्यात आला आहे. पाटील यांनी या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत ईडी, सीबीआयसारख्या त्रयस्थ संस्थांमार्फत चौकशी करण्याची मागणीही तक्रारीत केली आहे.

Post a Comment

0 Comments