Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

को-हाळे येथील वृद्ध दांपत्याचा खून प्रकरणातील आरोपी अटक ; नगर एलसीबीची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
राहाता - अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील को-हाळे चांगलेवस्तीवर झालेल्या वृद्ध दांपत्याच्या   खून प्रकरणातील तीन आरोपी अटक करण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. बेंद्रया उर्फ देवेंद्र दूधकाल्या उर्फ भोसले (वय २८ रा.पढेगाव ता.कोपरगाव), दिलीप विकास भोसले (वय १९), आवेल विकास भोसले (वय २० दोघेही रा.जवळके ता.कोपरगाव) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, आरोपींची मोठ्याचा चाणक्षाने माहिती मिळून स्थानिक गुन्हे शाखेच्या पो. नि. अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ दत्तात्रेय हिंगडे,  विश्वास बेरड, पोना सुनील चव्हाण, सुरेश माळी, संदीप पवार, शंकर चौधरी, पोकाॅ संतोष लोंढे, विशाल दळवी, सचिन आडबल, दिनेश मोरे, दीपक शिंदे, संदीप चव्हाण, सागर ससाणे,  रोहित येमुल, रवींद्र घुंगासे, रणजित जाधव, जालिंदर माने, प्रकाश वाघ, संदीप दरंदले, आकाश काळे, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते, रोहिदास नवगिरे, मच्छिंद्र बर्डे, चापोहेकाॅ अर्जुन बडे, संभाजी कोतकर, बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली. प्रमोद शशिकांत चांगले यांचे वडील शशिकांत चांगले व आई सिंधुबाई आणि चुलते यांच्यामध्ये शेतीच्या कारणावरून बरेच दिवसापासून वाद चालू होते. दि.२५  जून रोजी रात्री प्रमोद चांगले यांचे आई वडील हे को-हाळे (ता. राहाता) येथील चांगले वस्तीवरील घरामध्ये वडील शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व आई सिंधुबाई शशिकांत चांगले (वय ५०) हे झोपेत असताना अज्ञाताने डोक्यामध्ये फावड्याने मारून गंभीर जखमी करून त्यांची झोपेमध्येच खून झाला होता. याप्रकरणी राहता पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल होता.

Post a Comment

0 Comments