Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बोगस वटाणा बियाणे घेऊन जाणारा ट्रक पकडला ; कृषी विभाग व पोलिसांची संयुक्त कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी नेणा-या ट्रकवर छापा टाकून ६ लाख रुपयांचा माल जप्त करण्याची मोठी कारवाई कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने करून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,बोगस वटाणा बियाणे विक्रीसाठी येणार असून कृषी विभाग व पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई करत ट्रकमध्ये  प्रती बग 40 किलो, एकूण बॅग संख्या 150 असा 6 लाख-रुपयाचा बनावट वटाणा बियाणे हस्तगत केले आहे. या प्रकरणी पारनेर ठाण्यामध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेबाबत   किरण गुलाबराव गवय ( वय 45 म. रा. श्रीगोंदा जि.अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
बनावट बियाणे संदर्भामध्ये कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने काल वटाण्याचा बियाणांचा आला असून त्यामध्ये बनावट बियाणे असल्याचे माहिती पथकाला मिळाली होती. या प्रकरणात या ठिकाणी सापळा रचून संबंधित चालकाच्या पण अधिक माहिती पोलिसांनी घेतली सदरचा ट्रक (क्र.युपी 92 टी 8149) हा आंबेडकरचौक पारनेर येथे उभा होता.त्यात एकूण 6 टन वजनाचे बनावट वटाणा बियाणे आहे.  ट्रकमध्ये पटेल सिडस कार्पोरेशन जालौन युपी या कंपनीचे 6 टन व्हरायटी एपी 3 लट क्रमांक 21-24-510-16-2 प्रमाणित प्रमाणपत्र क्रमांक 30148 तपासणी दि. 2 मे 2021 टग ( क्रमांक 102175840556) बगचे वजन प्रती बग 40 किलो एकूण बग संख्या 150 असा एकुण 6 लाख रुपयाचा बनावट वटाणा बियाणे मिळून आला आहे.
 ट्रक क्रमांक (युपी 92 टी 8149 हीवरील चालक (नाव पत्ता माहीत नाही ) पटेल सिडस कार्पोरेशन जालीन युपी या कंपनीचा मालक नाव पत्ता माहीत नाही. याचेविरुद्ध भा.द.वि कलम 420 सह बियाणे नियंत्रण आदेश 1983 खंड 3 (1) जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 मधील कलम 3(2) व बियाणे अधिनीयम 1966 चे कलम 19,21 अन्वये नुसार पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सुनिलकुमार राठी ( कृषि विकास अधिकारी, जि.प. अहमदनगर), वाळीबा उपडे (कृषी अधिकारी पंचायत समिती पारनेर), विलास गायकवाड (तालुका कृषी अधिकारी पारनेर), जयंत साळवे (तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती पारनेर), किरण पिसाळ ( मंडळ कृषी अधिकारी पारनेर), श्रीमती शिंदे एम.के.विस्तार (अधिकारी कृषि, पंचायत समिती, पारनेर), उघडे व्ही. एन. (कृषि अधिकारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अहमदनगर), विलास गायकवाड किरण मांगडे (जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अहमदनगर) आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments