Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कर्जत पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजेंद्र गुंड यांची बिनविरोध निवड

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत - कर्जत पंचायत समितीच्या उपसभापतीपदी राजेंद्र गुंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. 
 कर्जत पंचायत समितीमध्ये काही दिवसांपूर्वी सभापतीपदी मनीषा दिलीप जाधव यांची निवड झाली होती त्याच वेळी पासून उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, दरम्यान कोरोना मुळे सर्व कामकाज ठप्प  असल्याने ही प्रक्रिया रेंगाळली होती, आज कर्जत पंचायत समिती मध्ये उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली, यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी कामकाज पाहिले तर गट विकास अधिकारी अमोल जाधव यांनी याकामी सहाय्य केले. सकाळी बारा वाजे पर्यत अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत पंचायत समिती सदस्य राजेंद्र बापूसाहेब गुंड यांचा एकट्याचा अर्ज दाखल झाला होता सर्व प्रक्रिया पूर्ण कर्जत गुंड यांची कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी गुंड यांचा सत्कार प्रशासनाच्या वतीने करण्यात आला यावेळी सभापती मनीषा जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मावळते उपसभापती हेमंत मोरे, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, माजी सभापती साधना कदम, दिलीप जाधव, दीपक शिंदे, अंकुश कदम, सहा गट विकास अधिकारी रूपचंद जगताप आदी उपस्थित होते. 


 उपसभापती राजेंद्र गुंड हे कर्जत तालुक्यातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. या अगोदर त्यांनी स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपली कारकीर्द पूर्ण केल्या नंतर पत्नी सौ मंजुषा गुंड यांना जिल्हा परिषद सदस्य करत थेट जिल्हा परिषद अध्यक्ष करून आपला आवाका सिद्ध केला आहे, कुळधरण  गटावर त्याचे वर्चस्व असून सध्या ते पंचायत समिती सदस्य असून कर्जत पंचायत समिती मध्ये राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना संधी मिळालेली असल्याने शेवटच्या कालावधी गुंड यांना उपसभापती पदाची संधी मिळाली मिळालेली असून त्याच्या अनुभवाचा नक्कीच फायदा कर्जत पंचायत समितीला होउ शकेल. राजेंद्र गुंड यांचे वडील बापूसाहेब गुंड हे पूर्वाश्रमीचे जगदंबा सह साखर कारखान्याचे चेअरमन होते, त्यांनी तालुक्याच्या राजकारणात मानाचे स्थान मिळविले होते त्याच्या पावलावर पाऊल पाऊल ठेवत राजेंद्र गुंड यांनीही आपला ठसा उमटवला आहे. कुळधरण परिसरात त्याचे मोठे बंधू महेंद्र गुंड यांनी त्रिमूर्ती पतसंस्थेचे माध्यमातून गुंड परिवारात विशेष काम  उभारले आहे, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आज शिक्षणाचे धडे घेत आहेत, आ रोहीत पवार यांचे सह अनेकांनी गुंड यांचे अभिनंदन केलेे आहे. कुळधरण येथील जेष्ठ नेते बाळासाहेब जगताप यांचे कालच दुःखद निधन झाल्याने गुंड यांच्या समर्थकांनी कुठलाही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला असल्याने कुळधरण सह कर्जत मध्ये कोणताही गाजावाजा न करता ही निवड प्रक्रिया पार पाडली गेली.

संकलन : आशिष बोरा

Post a Comment

0 Comments