Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीत आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी : आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांनी आपल्या विविध मागण्यासाठी पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकात लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले. यावेळी आशा स्वयंसेवक व गटप्रवर्तकांनी सर्व काम बंद करून आंदोलनात सहभागी झाले होते. 

आयटक संलग्न असलेल्या जिल्हा आशा कर्मचारी संघटनाने हे आंदोलनात सक्रीय भाग घेत आपल्या मागण्याचे निवेदन शासन दरबारी दिले आहे. नागरी विभागातील आशा स्वयंसेविकाना प्रतिदिन ३०० रुपये व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका यांना दरमहा १००० हजार रुपये म्हणजेच प्रतिदिन ३३ रुपये भत्ता देण्यात आला होता. नागरी व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे काम समान असताना त्यांना मिळणारा  मोबदला मधील फरक भेदभाव आहे. 
नागरी व ग्रामीण विभागातील आशा स्वयंसेविका गटप्रवर्तकांना प्रतिदिन ३०० रु.  दिले पाहिजे, .आशा स्वयंसेवक प्रवर्तकांचे काम अत्यावश्यक व नियमित स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना शासकीय नौकरीत कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा व तोपर्यंत आशा स्वयंसेवक १८ हजार   व गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये दरमहा पगार देण्यात यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलन प्रसंगी पंचायत समितीच्या सभापती सुनीता गोकुळ दौंड म्हणाल्या, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्या संदर्भात पंचायात समिती मार्फत पाठपुरावा करून आपल्या प्रलंबित प्रश्न बाबत न्याय मिळून देण्यास प्रयत्न करू. शिवसेना तालुकाप्रमुख,अंकुश चितळे,नगरसेवक बंडू बोरुडे,स्वाभिमानी मराठा महासंघाचे कृषिराज टकले यांनी आंदोलकांची भेट घेतली. 
संघटनेच्या तालुकाध्यक्षा मनिषा डांभे, सविता शिंदे, नाजीया शेख, अलका रुपनार, मनीषा पालवे, कविता पाखरे,अनिता कांबळे,वनिता गर्जे,संगीत भताने,शिलप्रभा फुंदे, सुवर्ण मरकड, मारुती सावंत उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments