Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

व्हेरियंटवर लस प्रभावी असल्याचा कोणताही वैज्ञानिक डेटा नाही : डॉ. वीके पॉल

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
देशात अजूनही कोरोनाचे संकट कायम आहे. यादरम्यान कोरोनाची नवं नवीन रुप आढळून येत आहेत. सध्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देशाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर कोविड टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटवर लस प्रभावी असल्याचा कोणताही वैज्ञानिक डेटा उपलब्ध नाही आहे, अशी माहिती डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे वाढणाऱ्या चिंतेदरम्यान डॉ. वीके पॉल म्हणाले की, ‘कोरोनाचे नवे रुप अत्यंत संसर्गजन्य आहे. यावर लस प्रभावी आहे की नाही याबाबत अजूनपर्यंत कोणताही वैज्ञानिका डेटा उपलब्ध नाही आहे. अनेक घटकांवर अजून एक लाट अवलंबून आहे. ज्यात कोविडच्या प्रती उपयुक्त व्यवहार, चाचणी आणि प्रतिबंधात्मक रणनीती आणि लसीकरणाचा दर याचा समावेश आहे.दरम्यान देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. आता देशातील १२ राज्यांमध्ये डेल्टा प्लस ५१ रुग्ण आढळले असल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहे. आतापर्यंत २९ डेल्टा प्लस रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय तामिळनाडूमध्ये नऊ, मध्य प्रदेशमध्ये सात, केरळमध्ये तीन, पंजाब आणि गुजरातमध्ये प्रत्येकी दोन-दोन, आंध्र प्रदेश, ओडिसा, राजस्थान, जम्मू-काश्मीर,हरियाण व कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्ण आढळला आहे.


Post a Comment

0 Comments